मंचर : शिरूर लोकसभा मतदार संघात आंबेगाव, खेड, जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागातील महिलांना स्वयंरोजगार मिळण्यासाठी फँशन डिझाईन व ब्युटी पार्लरचे मोफत प्रशिक्षण कौशल्य विकास व आदिवासी प्रकल्प कार्यालयामार्फत दिले जाईल.त्यातून त्यांना हक्काचा रोजगार मिळेल.” असे केंद्रीय आदिवासी विकास राज्यमंत्री रेणुका सिंह यांनी सांगितले.
मंचर येथे बुधवारी झालेल्या कार्यक्रमात सिंह यांचा सन्मान छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पुणे जिल्हा किसान मोर्चाचे अध्यक्ष संजय थोरात यांच्या हस्ते देऊन करण्यात आला. त्या म्हणाल्या “बाल हक्क सुरक्षा कायद्याची अमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी कार्यवाही केली जाईल. मुलामुलींमध्ये जनजागृतीसाठी विशेष प्रशिक्षणाचे आयोजन केले जाईल. आदिवासी भागात शाळा सुरु करणाऱ्यांना ताबडतोब परवानगी दिली जाईल. डोंगरी दुर्गम भागात व्यवस्थित नेटवर्क मिळण्यासाठी आवश्यक उपाययोजना हाती घेऊ. आदिवासी भागात जिल्हा परिषद दवाखान्यात डॉक्टर मुक्कामी थांबत नाहीत. हा विषय राज्यस्तरीय आहे.हिरडा खरेदी तसेच कांदा हमीभाव निर्यात याबाबत अभ्यास केल्यानंतर मत व्यक्त केले जाईल.
यावेळी आमदार महेश लांडगे, पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष गणेश भेगडे, अँड धर्मेंद्र खंडारे, आशा बुचके, जयसिंग एरंडे, विजय पवार,डॉ. ताराचंद कराळे, रुपाली घोलप, प्रा.उत्तम राक्षे, गणेश थोरात,नवनाथ थोरात उपस्थित होते. प्रास्ताविक संजय थोरात यांनी व पूजा थिगळे यांनी सूत्रसंचालन केले.
“काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो” यात्रा काढली आहे. कितीतरी आमदार, नेते व कार्यकर्ते काँग्रेस सोडून जात आहेत. काँग्रेस नेतृत्वहीन झाली आहे. यापुढे त्यांना माणसं जोडो. यात्रा काढावी लागेल. अन्यथा या पुढील काळात काँग्रेसला गुगलवर शोधण्याची वेळ येऊ शकते.”
रेणुका सिंह, राज्यमंत्री केंद्रीय आदिवासी विकास
मंचर (ता.आंबेगाव) केंद्रीय आदिवासी विकास राज्यमंत्री रेणुका सिंह यांचा सन्मान छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा देऊन पुणे जिल्हा किसान मोर्चाचे अध्यक्ष संजय थोरात यांच्या हस्ते करण्यात आला. आमदार महेश लांडगे (उजवीकडून दुसरे) व अन्य.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.