नारायणगाव : येथील पुणे नाशिक महामार्गावरील बाह्यवळण रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी आवश्यक त्या प्राथमिक उपाययोजना तातडीने करा.बाह्यवळण रस्त्याच्या कामातील त्रुटीमुळे अपघात झाल्यास राष्ट्रीय महामार्गाचे संबंधित अधिकारी यांच्यावर प्रशासकीय कारवाई करावी लागेल. असा इशारा खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी व ग्रामस्थ यांच्या बैठकीत दिला.येथील बाह्यवळण रस्त्याच्या खोडद चौकात झालेल्या अपघातात खोडद येथील कल्पना योगेश भोर(वय ३२) या विवाहितेचा मृत्यू झाला.त्या नंतर खोडद व हिवरे तर्फे नारायणगाव ग्रामस्थांनी आंदोलन करून बाह्यवळण रस्ता वाहतुकीसाठी बंद केला होता.
खासदार डॉ. कोल्हे यांनी तीस नोव्हेंबर रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेतली. या वेळी खोडद चौकातील भुयारी मार्गांच्या मंजुरीसाठी तातडीने बैठक आयोजित करण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री गडकरी यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर आज खासदार डॉ. कोल्हे यांनी योगेश भोर यांची भेट घेऊन सांत्वन केले.त्या नंतर त्यांनी अपघातग्रस्त बाह्यवळण रस्त्याची पहाणी करून अपघात टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील या संदर्भात खोडद ग्रामस्थ व राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी यांचे समावेत बैठक घेतली. या वेळी युवा नेते अमित बेनके, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे वरिष्ठ अधिकारी अमित गोरड,सी डी फकीर, दिलीप शिंदे, तहसीलदार रवींद्र सबनीस, उपविभागीय पोलीस ठाण्यात मंदार जवळे, पोलिस निरीक्षक विलास देशपांडे , माजी सरपंच गुलाबराव नेहरकर, जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष रमेश भुजबळ, पांडुरंग पवार, अवधूत खरमाळे, इंद्रजीत गायकवाड, आशीष वाजगे, गणेश वाजगे, विकास दरेकर आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी अवधूत खरमाळे, इंद्रजीत गायकवाड यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कामाविषयी नाराजी व्यक्त केली.खरमाळे म्हणाले अपघात टाळण्यासाठी खोडद चौकात गतिरोधक व अन्य सुधारणा करून वाहनांचा वेग कमी करणे आवश्यक आहे.या साठी आम्ही दोन वर्षे पाठपुरावा करत आहोत. मात्र राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही.खासदार डॉ. कोल्हे म्हणाले खोडद चौकात १५ फूट रुंद व साडेपाच मीटर उंच भुयारी मार्ग करण्यात येईल. मात्र मंजूरी व इतर तांत्रीक बाबी साठी वेळ लागणार आहे. दरम्यान अपघात टाळण्यासाठी खोडद कडून येणाऱ्या वाहनांना थांबण्यासाठी योग्य जागा निर्माण करणे.दोन गतिरोधकाच्या मधल्या पट्यात योग्य जाडीचे गतिरोधक व रबलर बसवण्याची गरज आहे.अपघात टाळण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा येत्या आठ दिवसांत तातडीने करण्याच्या सूचना केल्या आहेत. या कामात हलगर्जीपणा केल्यास व अपघात झाल्यास प्रशासकीय कारवाई करावी लागेल. असा इशारा या वेळी खासदार डॉ.कोल्हे यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या उपस्थित अधीकाऱ्यांना दिला.या वेळी झालेल्या चर्चेत अमित बेनके, गुलाबराव नेहरकर, आशिष वाजगे, सूरज वाजगे भाग घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.