सत्ताबदल झाला अन् भल्या पहाटे झाली अधिकाऱ्यांची धावपळ!

Administrative officer have to work on early morning after government change
Administrative officer have to work on early morning after government change
Updated on

बारामती : सत्ताबदल झाल्यानंतर राज्यातील अधिकाऱ्यांची देखील धावपळ सुरू झाली आहे. विशेषतः पुणे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना सकाळी लवकर उठून कामाला प्रारंभ करावा लागत आहे. 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे भल्या सकाळी कामाला सुरुवात करतात, कामकाज करताना वरिष्ठ अधिकारी सोबत हवेत हा त्यांचा शिरस्ता! त्यामुळे सर्वच प्रमुख अधिकाऱ्यांना अजित पवार ज्यादिवशी पुणे शहर किंवा पुणे जिल्ह्यात असतील त्या दिवशी सकाळी लवकर आवरावे लागते.

उपमुख्यमंत्र्यांचा कुठल्या कामासाठी कधी निरोप येईल याचा नेम नसल्याने अधिकाऱ्यांना देखील सतत तयार राहावे लागते. आज देखील सकाळी सात पासूनच अजित पवार यांचा कामाचा धडाका सुरू झाला. सकाळी सात वाजल्यापासून अजित पवार यांनी अतिरिक्त पोलिस महासंचालक बिपीन बिहारी व पुण्याचे पोलीस आयुक्त वेंकटेश यांना सोबत घेऊन पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरांच्या दुरवस्थेची पाहणी केली.

पोलिस गृहनिर्माण योजनेचा त्यांनी आढावा घेतला व पोलिसांना हक्काची घरे देण्याच्या दृष्टिकोनातून काय करता येईल या संदर्भात त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पालकमंत्री सकाळी सात वाजल्यापासून कामाला लागत असल्यामुळे अधिकार्‍यांना देखील सकाळी लवकर आवरून बाहेर पडावे लागत आहे.

केवळ सकाळच्या कामा पुरताच हा भाग मर्यादित नसून अनेकदा रात्री उशिरापर्यंत बैठकांचे सत्र सुरू राहते, त्यामुळे आता अधिकाऱ्यांना काम करण्याशिवाय पर्यायच उरला नसल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात रंगत आहे. अजित पवार यांच्या कामाची गती विचारात घेता या गतीला टिकणारे अधिकारीच या जिल्ह्यात राहू शकतील . जी अधिकारी ही गती पकडू शकणार नाहीत त्यांना बाहेरचा रस्ता दाखविला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

पालकमंत्री झाल्यानंतर अजित पवारच प्रथमच पुण्यात आले आणि सकाळी सात वाजता त्यांनी औंध येथील पोलीस गृहनिर्माण वसाहतीत जात पोलिसांच्या घराबाबत अतिरिक्त पोलिस महासंचालक बिपीन बिहारी व पुण्याचे पोलीस आयुक्त व्यंकटेश यांच्याशी सविस्तर चर्चा केली . यापुढील काळात इतर बाबीं पेक्षा विकासाला प्राधान्य दिले जाणार आहे हे अजित पवार यांनी आज पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्याच भेटीत दाखवून दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.