सामाजिक न्याय विभागाच्या निवासी शाळांमध्ये प्रवेशोत्सव

प्राथमिक शाळांच्या धर्तीवर यंदा पुणे जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाच्या अख्त्यारित येत असलेल्या निवासी शाळांमध्येही प्रवेशोत्सव साजरा केला जाणार आहे.
admission
admissionsakal
Updated on
Summary

प्राथमिक शाळांच्या धर्तीवर यंदा पुणे जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाच्या अख्त्यारित येत असलेल्या निवासी शाळांमध्येही प्रवेशोत्सव साजरा केला जाणार आहे.

पुणे - प्राथमिक शाळांच्या धर्तीवर यंदा पुणे जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाच्या अख्त्यारित येत असलेल्या निवासी शाळांमध्येही प्रवेशोत्सव साजरा केला जाणार आहे. या निवासी शाळांमध्ये अनुसुचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.

यानुसार शाळेच्या पहिल्या दिवशी येत्या बुधवारी (ता.१५) मुलांचे गुलाबपुष्प देऊन आणि पुस्तके व अन्य शालेय साहित्याचे वाटप करून मुलांचे स्वागत केले जाणार असल्याचे सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्त संगिता डावखर आणि विशेष समाजकल्याण अधिकारी एम. आर. हरसुरे यांनी सांगितले. पुणे जिल्ह्यात दिवे (ता. पुरंदर), पेठ (ता. आंबेगाव), तरंगवाडी (ता. इंदापूर) या तीन ठिकाणी मुलांसाठीच्या निवासी शाळा आहेत. शिवाय चांडोली (ता. खेड) येथे मुलींसाठीची निवासी शाळा आहे. या चारही निवासी शाळांमध्ये हा प्रवेशोत्सव साजरा केला जाणार आहे.

या प्रवेशोत्सवात प्रभातफेरीचे आयोजन करणे, विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देत स्वागत करणे, विद्यार्थ्यांना पुस्तके व शालोपयोगी साहित्याचे वाटप करणे आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. शिवाय रांगोळी, तोरणे व फुलांची सजावटही केली जाणार आहे. या सर्व निवासी शाळांमध्ये सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक, जीम साहित्य, ई लायब्ररी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही, सायन्स सेंटर इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे अनुसुचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी या निवासी शाळांमध्ये प्रवेश घेण्याचे आवाहनही डावखर व हरसुरे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.