विद्यार्थी, पालकांनो सावधान! 

savdhan 11.JPG
savdhan 11.JPG
Updated on

पुण्यातील महाविद्यालयात प्रवेशाच्या नावाखाली होतेय फसवणूक 

पुणे : आंबेगाव परिसरात अनेक नामवंत महाविद्यालये असून, या महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थी-पालकांकडून एजंटांची फौज हजारो रुपये उकळत आहे. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांची फसवणूक होत असून, प्रवेशासाठी पालकांनी अशा एजंटांकडे जाऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

आंबेगाव परिसरातील काही महाविद्यालयांत प्रवेश मिळवून देतो, असे सांगून हे एजंट पालकांकडून पैसे उकळत आहेत. आपली फसवणूक झाल्याचे उशिरा लक्षात येत असल्याने पालक व विद्यार्थी हतबल झाले आहेत. परराज्यातील व बाहेर गावचे पालक, विद्यार्थी वादाला घाबरून तसेच भविष्याचा विचार करून तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. त्यामुळे या एजंटांचे फावते आहे.
प्रवेश घेणाऱ्यांची पुण्यात फारशी ओळख नसते. त्यामुळे प्रवेश घेण्यास झालेला उशीर वा अन्य बाबी फसवणुकीसाठी एजंटांना पुरेशा ठरत आहेत.
काही महाविद्यालयांतील विद्यार्थीच प्रवेशासाठी उत्सुक असलेल्या नवख्यांना नकळत, तर कधी आर्थिक फायद्यासाठी प्रवेशाचा आडमार्ग दाखवत असल्याने ही परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे पालक आणि प्रवेशास उत्सुक विद्यार्थ्यांनी सजग राहावे, कुठल्याही गैरमार्गाने न जाता कायदेशीर मार्गाने प्रवेश घ्यावा, असे मत जाणकार व्यक्त करीत आहेत. 

वाद नकाे म्हणून...
माझी प्रवेशाच्या नावाखाली फसवणूक झाली असून, मी बाहेरगावचा असल्याने वाद नको आणि शिक्षण घ्यायचे असल्याने मी तक्रार केली नाही; परंतु आजतागायत मी घरच्यांनाही हा प्रकार सांगितला नाही. फसवणूक झाल्यावर होणारा मनस्ताप फार त्रासदायक असतो. काही इतर लोकांचीही झालेली फसवणूक मी पाहिली आहे. सर्वच अतिशय दुःखद आहे, अशी व्यथा फसवणूक झालेल्या एका विद्यार्थ्याने नाव न छापण्याच्या अटीवर "सकाळ'कडे बोलून दाखविली. 

' कोणत्याही शैक्षणिक संस्थेचे अधिकृत कार्यालय असते. अशा अधिकृत यंत्रणेकडून प्रवेशाची संपूर्ण माहिती घेऊन प्रवेश घ्यावा.' 
- डॉ. प्रसनाथा रेड्डी, प्राचार्य, एनबीएन सिंहगड इन्स्टिट्यूट 

' फसवणुकीच्या तक्रारींची आम्ही दखल घेतोच; परंतु अनेकदा तक्रार आमच्यापर्यंत पोचत नाही. हे व्यवहार रोखीने होत असल्याने कारवाईला कायदेशीर मर्यादा पडतात. त्यामुळे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी विवेकबुद्धीने निर्णय घ्यावेत.'
- मनमीत राऊत, सहायक पोलिस निरीक्षक, आंबेगाव पठार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.