इंदापूर : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने डायरेक्ट सेकंड इयर इंजिनीरिंग ऍडमिशन साठी फक्त शेवटच्या २ सत्राची सरासरी न काढता थेट सर्व ६ सत्राच्या गुणांची सरासरी काढून त्यावर प्रवेश द्यावा अशी आग्रही मागणी विद्यार्थ्यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे. डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांची नुकतेच शेवटच्या सत्राची परीक्षा ऑनलाइन पध्दतीने संपली असून आता त्यांच्यात ऑनलाइन झालेली परीक्षा आणि त्यामुळे वाढलेली टक्केवारीमुळे डायरेक्ट सेकंड इयर इंजिनीरिंग ऍडमिशनला चांगलाच मनस्ताप होणार आहे. डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांची मागील २ सत्राची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने झाली आहे, त्यामुळे निकालामध्ये मोठी भर पडली आहे. (Pune News)
डायरेक्ट सेकंड इयर इंजिनीरिंग ऍडमिशनला फक्त १० टक्के जागा उपलब्ध आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला चांगल्या महाविद्यालयात ऍडमिशन मिळेल का नाही? याची चांगलीच भीती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ संलग्नित महाविद्यालयाच्या सर्व क्लास डीक्लरेशन च्या विषयांची परीक्षा ही ऑनलाइन पद्धतीने झाली आहे तर काही स्वायत्त संस्थेचे काही पेपर हे ऑफलाईन पद्धतीने झाले आहेत.
त्यामुळे विध्यार्थ्यांच्या टक्केवारी मध्ये चांगलाच फरक पडणार आहे. त्यामुळे एवढीटक्केवारीवाढली असेल तर आपल्याला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळेल का नाही? हा प्रश्न विद्यार्थ्यांना सतत भेडसावत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड मानसिक त्रास होत आहे. त्यामुळे शासनाने कुणावर अन्याय होणार नाही, हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळून शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध होतील अशी सर्वसमावेशक भूमिका घ्यावी असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.