Engineering : बीई, बी.टेक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया रविवारपासून

तुम्ही अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यास इच्छुक असाल, तर तुम्हाला रविवारपर्यंत (ता. १४) प्रतीक्षा करावी लागणार आहे.
Engineering
Engineering sakal
Updated on

पुणे : तुम्ही अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यास इच्छुक असाल, तर तुम्हाला रविवारपर्यंत (ता. १४) प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (सीईटी सेल) संभाव्य वेळापत्रकाप्रमाणे बुधवारीच बीई आणि बी.टेक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया जाहीर होणे अपेक्षित होते. परंतु सीईटी सेलने अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची प्रक्रिया रविवारपर्यंत पुढे ढकलली आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे तंत्र शिक्षण, उच्च शिक्षण, कृषी शिक्षण, फाइन आर्ट्स अशा पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ‘प्रवेश परीक्षा’ घेण्यात येते. तसेच या अभ्यासक्रमांच्या केंद्रीय प्रवेशाची प्रक्रियादेखील राबविली जाते. सीईटी सेलच्या नव्या वेळापत्रकाप्रमाणे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया रविवारपासून सुरू होणार आहे. तर तीन वर्षे विधी अभ्यासक्रम, बी. एचएमसीटी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया गुरुवारपासून (ता. ११), एमबीए/एमएमएस, बी.डिझाईन अशा अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा शुक्रवारपासून (ता. १२) सुरू होणार असल्याचे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे. कृषी विभागांतर्गत नऊ व्यावसायिक अभ्यासक्रम आणि थेट द्वितीय वर्ष अभ्यासक्रमांची, उच्च शिक्षण विभागांतर्गत दोन व्यावसायिक अभ्यासक्रमांची आणि तंत्र शिक्षणांतर्गत तीन व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सीईटी सेलने यापूर्वीच सुरू केलेली आहे. उर्वरित अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया टप्प्याटप्प्याने जाहीर करण्यात येत आहे.

प्रवेशाचे वेळापत्रक :

  • अभ्यासक्रम : ‘कॅप’ प्रवेश सुरू होण्याचा कालावधी

  • बी.एचएमसीटी, एलएलबी (३ वर्षे) : ११ जुलै

  • एमबीए/एमएमएस, बी.डिझाईन, बी.फार्मसी, बी.एड-एम.एड, बी.पी.एड, एम.पी.एड, एम.एड : १२ जुलै

  • एम.एचएमसीटी, बी.एड : १३ जुलै

  • बीई/बी.टेक : १४ जुलै

  • थेट अभियांत्रिकी अभ्यासक्रम दुसरे वर्ष : १५ जुलै

  • थेट औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम दुसरे वर्ष : १६ जुलै

  • अधिक माहितीसाठी : https://cetcell.mahacet.org/

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.