झेरॉक्सचे पैसे दिले नाही म्हणून अ‍ॅड. असीम सरोदेंनी EDला पाठवली नोटीस!

 Advocate Asim Sarode sent Notice to ED for recovery of Xerox money
Advocate Asim Sarode sent Notice to ED for recovery of Xerox money
Updated on

पुणे : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणांची चौकशी करून त्यातील पैसे सरकारी तिजोरीत जमा करणाऱ्या  सक्त वसुली संचालनालयासच (ईडीलाच) अ‍ॅड. असीम सरोदे यांनी एक हजार ४४० रुपयांच्या वसुलीसाठी नोटीस पाठवली आहे.

Valentine Special: 'फिल माय लव्ह', आर्याची जादू आजही कायम!​

भोसरी येथील भूखंड प्रकरणातील कागदपत्रांच्या झेरॉक्सचे एक हजार ३४० रुपये आणि नोटिशीचा १०० रुपये खर्च, असे एकूण एक हजार ४४० रुपयांच्या वसुलीसाठी २५ जानेवारी रोजी ही नोटीस पाठविण्यात आल्याची माहिती अ‍ॅड. सरोदे यांनी दिली. भोसरी औद्योगिक वसाहतीतील भूखंड खरेदी प्रकरणात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे नाव पुढे आले आहे. या प्रकरणात अंजली दमानिया यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्यावतीने अ‍ॅड. सरोदे बाजू मांडत आहेत. या प्रकरणाची काही कागदपत्रे ईडीला चौकशीसाठी हवी होती. त्यामुळे ईडीचे सहायक संचालक राजेश कुमार यांनी २९ डिसेंबर २०२० रोजी अ‍ॅड. सरोदे यांच्याकडे फोनवरून कागदपत्रांची मागणी केली होती. त्याबाबतचा मेल ईडीच्या कार्यालयातून पाठवण्यात आला होता. त्यानंतर ईडीने पाठवलेला व्यक्ती अ‍ॅड. सरोदे यांच्या कार्यालयात आला मात्र त्याने कागदपत्रे नेलेच नाहीत. माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित आहे. म्हणून मी कागदपत्रे घेऊन जाऊ शकत नाही, असे कारण त्याने त्यावेळी दिल्याचे अ‍ॅड. सरोदे यांनी स्पष्ट केले होते.

याबाबत ईडीच्या सहायक संचालकांना नोटीस पाठवून अ‍ॅड. सरोदे यांनी नाराजी नोंदवली होती. ईडी ही नामवंत शासकीय संस्था असून त्यांनी अनधिकृत व्यक्तीमार्फत महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत करणे चुकीचे आहे. तसेच या कागदपत्रांच्या झेरॉक्स काढण्यासाठी आलेला खर्च देण्याची तसदीही ईडीने घेतलेली नाही. आम्ही समाजातील वंचित घटकांसाठी मोफत कायदेशीर सल्ला देतो. त्यामुळे व्यावसायिक कामातून मिळणारे शुल्क महत्त्वाचे असते. त्यामुळे भूखंड प्रकरणाच्या कागदपत्रांच्या झेरॉक्ससाठी झालेला खर्च ईडीने द्यावा, अशी मागणी नोटीसमध्ये करण्यात आल्याचे अ‍ॅड. सरोदे यांनी सांगितले.

'एक हजारों में मेरी बहना है!'; बहीण सरपंच होताच भावानं दिलं मोठं गिफ्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.