20 दिवसानंतर पुण्यात पेट्रोल-डिझेल महागलं; पाहा आजचे दर

petrol Diesel
petrol Diesel
Updated on

पुणे : गेल्या वीस दिवसांपासून स्थिर असलेले इंधन दरवाढीचे(Fuel price hike) मीटर आता पुन्हा सुरू झाले आहे. मंगळवारी शहरात साध्या पेट्रोलच्या(Petrol) दरात 17 पैशांनी वाढ झाली आहे. तर(Diesel) डिझेल 21 पैशांनी (Money) महाग (Expensive) झाले आहे. पुणेकरांना (Pune) आता प्रति लिटर(Per Liter) पेट्रोलसाठी 96.62 तर डिझेलसाठी 86.32 रुपये मोजावे लागणार आहे.

अनलॉक(Unlock) सुरू झाल्यानंतर गेल्यावर्षी इंधनाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यानंतर नोव्हेंबर- डिसेंबर 2020 दरम्यान दर अल्प प्रमाणात कमी झाले होते. मात्र जानेवारीनंतर पुन्हा इंधन दरवाढ सुरू झाली होती. फेब्रुवारी अखेरपर्यत अल्प प्रमाणात का होईना इंधनाचे दर वाढतच होते. मार्चमध्ये कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढायला सुरवात झाल्यानंतर इंधन वितरणाच्यावेळांमध्ये मर्यादा (Limitation on time of Fuel distribution) आणण्यात आल्या होत्या. तेव्हापासून अगदी 4 मेपर्यंत इंधनाचे दर कमी-जास्त (Fuel prices fluctuate)होत होते. आता मात्र दरवाढीने (The price hike intensified) जोर धरला आहे. (after 20 days petrol-diesel Hike in Price at Pune Whats todays Price)

petrol Diesel
परदेशी शिक्षणासाठीची दिशाभूल थांबणार; विद्यार्थ्यांनी सुरू केलं स्टार्ट-अप

देशातील काही राज्यात निवडणुका असल्याने तसेच कोरोनाचे रुग्ण वाढल्याने इंधनाचे दर स्थिर होते. मात्र आता निवडणूक झाल्याने व कोरोना रुग्णांची संख्या देखील काही प्रमाणात कमी होत असल्याने पुन्हा इंधनाचे दर वाढवण्यात येत आहे, अशी टीका सोशल मीडियाद्वारे नागरिक सरकारवर करत आहेत.

दरम्यान सीएनजीचे दर अद्याप स्थिर आहेत. तर पॉवर पेट्रोल शहरात 100. 30 रुपयांना रुपयांना मिळत आहे. तर सीएनजी 55.50 रुपये प्रति किलो आहे. पॉवर पेट्रोलच्या दराने अध्याप 101 रुपये प्रतिलिटरचा आकडा ओलांडलेला नाही.

petrol Diesel
पुण्याला हवाय रोज ५० टन ऑक्सिजन

''गेल्या काही दिवसांत कुटुंबाच्या आरोग्यावर करण्यात येणाऱ्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. तर कोरोनामुळे माझे अर्थचक्र पूर्ण कोलमडले आहे. त्यामुळे किमान इंधनाच्या दरात कपात करून सरकार दिलासा देईल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात उलट घडत असून दर वाढतच आहे. या सर्व परिस्थितीत सर्वसामान्यांचा जगणं मुश्कील झालं आहे.''

- अतुल कोचरे, नोकरदार.

petrol Diesel
'महाआघाडी'त बिघाडी; शिवसेना-राष्ट्रवादीमधील वादाची चर्चा

शहरातील इंधनाचे दर

04-05-2021

  • पेट्रोल : 96.62

  • पॉवर पेट्रोल : 100.30

  • डिझेल : 86.32

  • सीएनजी : 55.50

15-04-2021

  • पेट्रोल : 96.45

  • पॉवर पेट्रोल : 100.13

  • डिझेल : 86.11

  • सीएनजी : 55.50

23-02-2021

  • पेट्रोल : 96.96

  • पॉवर पेट्रोल : 100.64

  • डिझेल : 86.72

  • सीएनजी : 55.50

27-02-2021

  • पेट्रोल : 97.19

  • पॉवर पेट्रोल : 100.87

  • डिझेल : 86.88

  • सीएनजी : 55.50

24-03-2021

  • पेट्रोल : 97.02

  • पॉवर पेट्रोल : 100.70

  • डिझेल : 86.70

  • सीएनजी : 55.50

25-03-2021

  • पेट्रोल : 96.81

  • पॉवर पेट्रोल : 100.50

  • डिझेल : 86.49

  • सीएनजी : 55.50

30-03-2021

  • पेट्रोल : 96.60

  • पॉवर पेट्रोल : 100.29

  • डिझेल : 86.26

  • सीएनजी : 55.50

petrol Diesel
'महाआघाडी'त बिघाडी; शिवसेना-राष्ट्रवादीमधील वादाची चर्चा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()