पुणे : तब्बल 35 दिवसांच्या खंडानंतर बुधवारी (ता.25) पुन्हा पुणे जिल्ह्यातील दिवसभरातील एकूण नवीन कोरोना रुग्णांची एक हजारांची संख्या ओलांडली आहे. जिल्ह्यात बुधवारी 1 हजार 25 नवे रुग्ण आढळून आले आहेत. याआधी 21 ऑक्टोबरला 1 हजार 20 रुग्ण आढळले होते. त्यानंतर हा आकडा सातत्याने कमी होत गेला होता. यानुसार 16 नोव्हेंबरला सर्वांत कमी म्हणजे केवळ 359 रुग्णांची नोंद झाली होती. गेल्या 24 तासांत 11 हजार 572 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात कोरोना चाचण्या आणि नवीन रुग्णांचीही संख्या वाढू लागली आहे.
मंगळवारी (ता.24) हीच संख्या 836 इतकी होती. आजच्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील 426 जण आहेत. 652 जण कोरोनामुक्त झाले असून अन्य 16 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरातील नवीन रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त
रुग्णांचे प्रमाण आजही कमीच आहे. आजच्या एकूण मृत्यूंमध्ये पुणे शहरातील
सहा जण आणि पिंपरी चिंचवड व जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील प्रत्येकी पाच रुग्ण आहेत. तर नगरपालिका आणि कॅंन्टोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील एकाही
रुग्णाचा मृत्यू झाला नाही.
पुणे जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 3 लाख 38 हजार 596 झाली आहे. यापैकी आतापर्यंत 3 लाख 19 हजार 693 कोरोनामुक्त झाले आहेत. शिवाय आतापर्यंत 8 हजार 328 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील 397 रुग्ण आहेत.
पिंपरी-चिंचवडमध्ये 246, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात 276, नगरपालिका क्षेत्रात 73 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात चार नवे रुग्ण सापडले आहेत. नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही मंगळवारी (ता.24) रात्री आठ वाजल्यापासून बुधवारी (ता.25) रात्री आठ वाजेपर्यंतची आहे.
सक्रिय रुग्ण वाढले
नवीन रुग्णांबरोबरच सक्रिय रुग्णांच्या (ऍक्टिव्ह रुग्ण) संख्येतही मोठी वाढ झाली आहे. अगदी सात हजारांच्या आत आलेला हा आकडा आता पावणे अकरा हजारांवर गेला आहे. सध्या विविध रुग्णालयात 4 हजार 382 रुग्ण उपचार घेत आहेत. याव्यतिरिक्त 6 हजार 357 रुग्णांवर त्यांच्या घरातच उपचार करण्यात येत आहेत.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by : Ashish N. Kadam)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.