Pune: आधी समोश्यामध्ये कंडोम, गुटखा आणि खडे अन् आता बर्फात आढळला उंदीर, पुणेकरांच्या जीवाशी खेळ?

Pune: समोश्यात कंडोम, गुटखा आणि खडे आढळून आले ही घटना ताजी असतानाच आचा बर्फाच्या लादीमध्ये मेलेला उंदीर आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Pune
Puneesakal
Updated on

पुण्यात काल एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका प्रतिष्ठीत ऑटोमोबाईल कंपनीला पुरवलेल्या समोश्यात कंडोम, गुटखा आणि खडे आढळून आले ही घटना ताजी असतानाच आचा बर्फाच्या लादीमध्ये मेलेला उंदीर आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे पुणेकरांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.

राज्याच्या अनेक भागामध्ये उन्हाचा पारा वाढला आहे. तापमान ४२ अंशापर्यत पोहचले आहे. या प्रंचड उन्हाच्या पारात अनेकजण शीतपेय पिणे पंसत करतात. ज्युस, उसाचा रस यासह अन्य शीतपेयांमध्ये बर्फ टाकला जातो. मात्र, यामुळे आरोग्या धोक्यात येण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे बर्फाच्या लादीमध्ये मृत अवस्थेत सापडेला उंदीर. याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे. ही घडना जुन्नर तालूक्यातील आहे.

Pune
Pune: समोस्यामध्ये चक्क कंडोम, गुटखा आणि खडे, पुण्याच्या ऑटो कंपनीमध्ये घडतंय तरी काय?

मेलेल्या उंदरामुळे उसाचा रस, बर्फाचा गोळा, लिंबू सरबत इत्यादी पिण्यामुळे लोकांना त्रास झाल्यास त्याला जबाबदार कोण? बर्फ बनवणाऱ्या कारखान्यामध्ये होत असलेला हलगर्जीपणा बर्फ साठवून ठेवलेल्या ठिकाणी नसलेली स्वच्छता व त्या ठिकाणी असलेला उंदीर-घुशी यांचा वावर यामुळे त्या बर्फाच्या लादीत उंदीर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. याविषयी संबधित खात्याने लक्ष घालणे गरजेचे आहे.

Pune
Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी; आंबेगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार

समोस्यामध्ये चक्क कंडोम, गुटखा आणि खडे

पिंपरी-चिंचवडमधील एका प्रतिष्ठित ऑटोमोबाईल कंपनीला पुरवलेल्या समोश्यांमध्ये कंडोम, गुटखा आणि खडे अढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पाच लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.