Pune : महाविद्यालये सुरू झाली; परीक्षा कशा होणार

ज्या विषयांची शिकवणी ऑनलाइन झाली त्यांची परीक्षा ऑनलाइन आणि ज्यांची शिकवणी ऑफलाईन झाली त्या विषयांची परीक्षा ऑफलाईन घ्यावी
colleges
collegessakal media
Updated on

पुणे : कोरोनामुळे दीर्घकाळ बंद असलेली महाविद्यालये प्रत्यक्ष सुरू झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र त्याचबरोबर आता परीक्षा नक्की कशा होणार, यासंबंधी संभ्रम दिसत आहे. याबद्दल विद्यार्थ्यांनी ‘सकाळ’ला व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रतिक्रिया कळविल्या आहेत. ज्या विषयांची शिकवणी ऑनलाइन झाली त्यांची परीक्षा ऑनलाइन आणि ज्यांची शिकवणी ऑफलाईन झाली त्या विषयांची परीक्षा ऑफलाईन घ्यावी, असा सूर विद्यार्थ्यांमधून उमटला आहे. त्यातील काही निवड प्रतिक्रिया खालील प्रमाणे....

"आमच्या सातव्या सत्राचे शिक्षण ऑनलाइन चालू झाले आहे. आता महाविद्यालय ऑफलाईन सुरू झाले आहे. पण आमच्या सातव्या सत्राची परीक्षा या ऑनलाइन स्वरूपात आणि एमसीक्यू पद्धतीने घेतल्या पाहिजे. कारण गेली दोन वर्षे आमच्या सर्व परीक्षा या ऑनलाइन झाल्यात. त्यामुळे आता लिखाणाचा सराव नसल्यामुळे परीक्षा या लेखी स्वरूपात देता येणार नाही."

- देवकाते श्रीकांत सुहास, अभियांत्रिकीचा विद्यार्थी, माळेगाव (बुद्रूक), बारामती

"आमची शिकवण ऑनलाइन पद्धतीने झाला आहे आणि ऑनलाइन पद्धतीनेच परीक्षा व्हायला हवी"

- अतुल दिलीप ठाकूर, विद्यार्थी, धुळे

"शिक्षण पद्धती ही ऑनलाइन झाल्यामुळे मुलाचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेला आहे. ऑफलाईन असताना ज्या गोष्टींचे योग्य पद्धतीने मूल्यमापन करता येते, त्या गोष्टींचे योग्य मूल्यमापन झालेले दिसून आलेले नाही. तसेच या परीक्षा ऑनलाइन बहुपर्यायी झाल्यामुळे मुलांना त्या विशिष्ट विषयाचे पूर्णपणे सर्वांगी ज्ञान ज्ञात झालेले दिसून येत नाही. म्हणून पुढील आगामी काळात शिक्षण पद्धती ही लवकरात लवकर ऑफलाईन पद्धतीने करून परीक्षा सुद्धा ऑफलाईन (लेखी) स्वरूपात झाल्या पाहिजे."

- शुभम चौधरी, अभियांत्रिकी विद्यार्थी

"आता ९० टक्के अभ्यासक्रम हा ऑनलाइन पद्धतीने शिकवलं गेला आहे. म्हणून या सत्राची परीक्षा पण ऑनलाइनच होऊ द्यावी"

- कुबेर टोपले,अभियांत्रिकी

"बहुतेक विद्यार्थ्यांचा फक्त कोरोनाचा एकच डोस झाला आहे. तसेच गेले दीड वर्ष विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने शिकत आहेत व परीक्षा देत आहेत. त्यामुळे विद्यापीठाला विनंती आहे की नवीन सत्रामध्येच ऑफलाईन अध्यापन आणि परीक्षा सुरू कराव्या, तूर्तास सर्व परीक्षा ऑनलाइन व्हाव्यात."

- शुभम शेडगे, विद्यार्थी, जे.एस.पी एम. नऱ्हे कॅम्पस

शिक्षक म्हणतात...

"संमिश्र शिक्षण पद्धत ही भविष्यात महत्त्वाची ठरणार आहे. सहामाही आणि वार्षिक परीक्षेसाठी मूल्यमापनासाठी पारंपारिक पद्धतच योग्य आहे. दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांना लेखी परीक्षा न झाल्यामुळे सरावाचा अभाव आहे. त्यामुळे विद्यार्थी परिपूर्ण होण्यासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये ऑनलाइन व ऑफलाईन दोन्ही पद्धतींचा वापर येत्या काळात करावा लागेल."

- प्रा. मृदुला सोलापूरकर, एशियन कॉलेज ऑफ सायन्स ॲण्ड कॉमर्स, धायरी,

"ऑनलाइन शिक्षणामुळे सर्वच प्रकारच्या शिक्षणावर मर्यादा आल्या आहेत. हे जरी खरे असले तरी, विद्यार्थ्यांनी स्वतः चा अभ्यास स्वतः करणे हे देखील अपेक्षित होतेच. ऑनलाइन शिक्षणामध्ये अभ्यास पूर्ण करण्याची जबाबदारी शिक्षकांप्रमाणेच विद्यार्थ्यांची ही असतेच. हे समजून त्याप्रमाणे महाविद्यालयीन पातळीवर त्यांच्यासाठी काही वेगळ्या छोट्या चाचण्या घेण्यात येऊन विद्यार्थ्यांची ऑफलाईन परीक्षेला सामोरे जाण्याची तयारी करता येऊ शकेल."

- चारुता कुलकर्णी, सेंट जोसेफ बॉईज हायस्कूल, खडकी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.