एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पुण्यात आज पुन्हा पावसाची हजेरी

After a day's rest in Pune, it rains again today
After a day's rest in Pune, it rains again today
Updated on

पुणे : शहर व परिसरात एका दिवसाच्या विश्रांतीनंतर मंगळवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे कमाल तापमानात वाढ तर किमान तापमानात किंचित घट झाली होती. तसेच पुढील सहा दिवसांमध्ये किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
शहरातील किमान तापमानाचा पारा 21 अंश सेल्सिअस पर्यंत पोहचू शकतो अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. याचबरोबर आठवड्याचा शेवटी म्हणजेच शनिवार व रविवार शहरात ढगाळ वातावरणाचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे. 

सर्दी,खोकल्यापासून "फेस शिल्ड'द्वारे बचाव 
मंगळवारी शहर व परिसरातील विविध भागांमध्ये दुपारी चार वाजल्यापासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. मात्र, अर्ध्या तासांमध्येच ढगांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. यावेळी सोसाट्याचे वारे वाहत असल्याने वातावरणात गारवा पसरला. कोंढवे धावडे, शिवणे, सिंहगड, पाषाण या परिसरात मेघगर्जनांसह मध्यम ते जोरदार पाऊस पडला. 

Lockdown : रेल्वेची आरक्षण केंद्रे 14 एप्रिलपर्यंत बंद
हवामान खात्याच्या माहितीनुसार पुढील दोन दिवस राज्यातील हवामान कोरडे असेल. तसेच मराठवाडा, विदर्भ येथे असलेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे (सायक्‍लॉनिक डिस्टर्बन्स) या भागात 5 ते 7 मार्च दरम्यान ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.