Pune Politics : कसबा पोटनिवडणूक झाल्यानंतर भाजप- काँग्रेस पहिल्यांदाच समोरासमोर

कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांचे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक समोरासमोर
Pune Politics
Pune PoliticsEsakal
Updated on

गेल्या काही दिवसांपासून गाजलेली आणि चर्चेत आलेली कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक पार पडली. कसबा पेठेतील 30 वर्षाच्या सत्तेला महाविकास आघाडीने सुरुंग लावला. कसबा पेठेत महाविकास आघाडीने दिलेल्या काँग्रेसच्या उमेदवाराने दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीत मोठ्या घडामोडी घडल्या. यावेळी आरोप प्रत्यारोप यांच्यामुळे चर्चेत आलेले भाजप- काँग्रेसचे नेते पहिल्यांदाच समोरासमोर आल्याचे दिसून आले.

कसब्याचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर आणि भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी आज हस्तांदोलन केलं. यानंतर मुळीक यांनी धंगेकर यांचं अभिनंदन केलं. पीएमपीएमएलच्या ठेकेदारांनी पुकारलेल्या संपामुळे पुण्यातील बस सेवा विस्कळीत झाली आहे. यासाठी आज पीएमपीएमएलचे संचालक ओम प्रकाश बकोरिया यांची भेट घेण्यासाठी काँग्रेसचे शिष्टमंडळ रवींद्र धंगेकर यांच्या नेतृत्वाखाली भेटण्यासाठी गेले होते.

याच वेळी भाजपचही शिष्टमंडळ या ठिकाणी आलं होतं. यावेळी केबिनमध्ये जगदीश मुळीक यांनी हात मिळवत रवींद्र धंगेकर यांचं अभिनंदन केलं. यावेळी काँग्रेसचे सचिव मोहन जोशी ही उपस्थित होते.

Pune Politics
Vasant More: "88 MLA" आमदारकीची नंबरप्लेट बघून तात्यांना मोह आवरेना

पुण्यातील ओलेक्ट्रा, हंसा, अँथोनी, ट्रॅव्हल टाईम या चार ठेकेदारांनी संप पुकारला आहे. ३ महिन्यांची बिले थकल्यामुळे या ठेकेदारांनी संप पुकारला आहे. ठेकेदारांच्या संपामुळे फटका पुणेकरांना बसणार आहे. पुण्यातील मोठी सार्वजनिक वाहतूक यामुळे कोलमडण्याची शक्यता आहे. जवळपास 1100 बसेस यामुळे धावणार नसल्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप होण्याची शक्यता आहे.

Pune Politics
Sanjay Raut : हक्कभंग नोटिशीला राऊतांकडून अजून उत्तर नाही; आता पुढे काय होणार?

पीएमपीएमलचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी ठेकेदारांना हा संप मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र ठेकेदार आपल्या निर्णयावर ठाम आहेत. ठेकेदारांनी अनेक वेळा पत्र व्यवहार करूनही त्यांना वेळेवर थकबाकी मिळालेली नाही. त्यामुळे त्यांनी संप पुकारला आहे.

काल (रविवारी) संध्याकाळी ठेकेदारांनी अचानक संपाचा निर्णय घेतल्यानंतर रस्त्यावर पीएमपीएमएल बस संख्या अचानक कमी झाली.पीएमपीएमएलकडे सध्या 2142 बसेस आहेत. यापैकी 1100 बसेस या ठेकेदारांच्या असून इतर 900 बसेस या पीएमपीच्या मालकीच्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.