Porsche Crash Case: अपघात प्रकरणानंतर अग्रवाल पती-पत्नीने कोणाच्या मध्यस्थीने डॉ. तावरेशी संपर्क साधला? पोलिस करणार तपास

Porsche Crash Case: विशाल आणि शिवानी अग्रवाल यांनी कोणाच्या मध्यस्थीने डॉ. अजय तावरे यांच्याशी संपर्क साधला, याचा तपास पोलिस करत आहे
Porsche Crash Case
Porsche Crash CaseEsakal
Updated on

पुणे: कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला वाचविण्यासाठी त्याच्या रक्ताचा नमुना बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणात विशाल आणि शिवानी अग्रवाल यांनी कोणाच्या मध्यस्थीने डॉ. अजय तावरे यांच्याशी संपर्क साधला. त्यांना भेटून रक्त नमुना बदलण्याबाबत आरोपी डॉ. श्रीहरी हाळनोर यांना कोणी मार्गदर्शन केले यासह विविध मुद्यांचा पोलिस तपास करत आहेत.

रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणात अल्पवयीन मुलाचे वडील व बांधकाम व्यावसायिक विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल (वय ५०) आणि आई शिवानी विशाल अग्रवाल (वय ४९, दोघेही रा. बंगलो क्र. १, ब्रम्हा सनसिटी, वडगाव शेरी) यांना शनिवारी (ता.१) अटक करण्यात आली आहे. त्यांना रविवारी (ता. २) दुपारी सुटीच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते.

Porsche Crash Case
Porsche Crash Case: अपघातानंतर ब्लड सॅम्पल बदलण्याचा सल्ला कोणी दिला? पुणे पोर्शे प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या आईचा खुलासा

शिवानी यांनी मुलाच्या ऐवजी स्वतःचे रक्त तपासणीसाठी दिल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. विशाल अग्रवाल यांच्या सांगण्यावरून ससूनच्या आपत्कालीन विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर यांनी शिवानी यांचे रक्त घेतल्याचे समोर आले आहे. त्यानुसार विशाल यांना शनिवारी संध्याकाळी ससूनमधील डॉक्टरांवर दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. डॉक्टरांवर दाखल असलेल्या गुन्ह्यात विशाल यांना अटक करण्याची परवानगी मिळण्याबाबतचा अर्ज पोलिसांनी शुक्रवारी दाखल केला होता.

Porsche Crash Case
Pune Porsche Car Crash: "मला मारु नका, हवे तेवढे पैसे देतो..."; दोघांना कारनं उडवल्यानंतरही बिल्डरपुत्राचा तोरा होता कायम

अग्रवाल पती-पत्नीला बुधवारपर्यंत पोलिस कोठडी ः

अग्रवाल पती-पत्नीच्या रक्ताचा नमून घेऊन डीएनए तपासणीसाठी पाठवायचा आहे. विशाल अग्रवाल याने ससूनमधील कर्मचारी अतुल घटकांबळे याला दोन संशयित व्यक्तींच्या मदतीने तीन लाख रुपये डॉ. हाळनोर यांना दिले आहेत. त्या व्यक्तींची माहिती घ्यायची आहे. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने डॉ. हाळनोर याने अल्पवयीन मुलगा आणि इतरांचे रक्त घेताना वापरलेली सिरीज आणि मुळ रक्ताचा नमुना अग्रवाल पती-पत्नीकडे दिला काय याचा तपास करायचा आहे.

तसेच गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी गुन्ह्यातील सर्व आरोपींकडे एकत्रित तपास करायचा असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील नितीन कोंघे यांनी केली. आरोपींच्यावतीने ॲड. प्रशांत पाटील यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत विशेष न्यायाधीश एस. एस. वाघमारे यांनी अग्रवाल पती-पत्नीला बुधवारपर्यंत (ता.५) पोलिस कोठडी सुनावली.

Porsche Crash Case
Pune Porsche Crash : बाल सुधारगृहात कसा असतो दिनक्रम? विशाल अग्रवालच्या आरोपी मुलाची १४ दिवस झाली रवानगी

आणखी काही आरोपींचा सहभाग निष्पन्न ः

रक्ताचा नमुना घेतला त्या दिवशीचे ससून रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले आहेत. त्या फुटेजची पाहणी केली असता त्यातून महत्त्वाचे धागेदोरे प्राप्त झाले असून आणखी काही आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला आहे, अशी माहिती या गुन्ह्याचे तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयास दिली.

आई-वडील व आजोबा अटकेत, मुलगा सुधारगृहात :

कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलगा सध्या बाल सुधारगृहात आहे. त्याला पाच जूनपर्यंत सुधारगृहात ठेवण्याचा आदेश बाल न्याय मंडळाने दिला आहे. तर या गुन्ह्यात मुलाचे वडील, आई आणि आजोबा अटकेत आहेत. अपघातानंतर चालकाच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याप्रकरणात विशाल अग्रवाल आणि मुलाचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना अटक झाली होती. त्या गुन्ह्यात दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Porsche Crash Case
Pune Car Crash Case: कल्याणीनगर प्रकरणातील आरोपीला निबंध लिहण्याची शिक्षा देऊन जामीन देणारा कोण? सदस्यांची होणार चौकशी

तावरेसह इतरांच्या कोठडीत पाच जूनपर्यंत वाढ :

अल्पवयीन मोटार चालकाला वाचविण्यासाठी त्याच्या रक्ताचा नमुना बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर यांच्यासह शिपाई अतुल घटकांबळे यांच्या पोलिस कोठडीत पाच जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

विशाल अग्रवालसह पब मालकांच्या जामिनावर बुधवारी सुनावणी :

न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींच्या जामीन अर्जाबाबत पोलिसांनी त्यांचे म्हणणे शनिवारी (ता.१) सादर केले आहे.

आरोपींच्या अर्जावर आता बुधवारी (ता. ५) सुनावणी होणार आहे. अल्पवयीन मुलाला मोटार चालविण्यास देण्याबरोबरच अल्पवयीन मुलासह त्याच्या मित्रांना टेबलवर मद्य पुरविल्याप्रकरणी अटकेत असलेले बांधकाम व्यावसायिक, कोझी व ब्लॅक पबच्या मालकांसह कर्मचाऱ्यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने पोलिसांना शनिवारी (ता. १) आपले म्हणणे मांडण्याची सूचना केली. त्यानुसार पोलिसांनी आपले म्हणणे लेखी स्वरूपात सादर केली आहे.

Porsche Crash Case
Pune Car Crash Case: कल्याणीनगर प्रकरणातील आरोपीला निबंध लिहण्याची शिक्षा देऊन जामीन देणारा कोण? सदस्यांची होणार चौकशी

विशाल अग्रवाल यांच्यावर एकूण तीन गुन्हे ः

या प्रकरणात विशाल अग्रवाल यांच्यावर एकूण तीन गुन्हे दाखल झाले आहेत. अल्पवयीन मुलाला वाहन चालविण्यास परवानगी दिली. अपघाताचा गुन्हा स्वतःवर घेण्यासाठी दबाव टाकत चालक गंगाधर शिवराज हेरीक्रुब यांच्या अपहरणाचा प्रयत्न केला. तसेच रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केला, असे तीन गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. यातील पहिल्या दोन गुन्ह्यांत त्यांची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

या मुद्यांचा होणार तपास ः

- विशाल व शिवानी अग्रवाल यांनी डॉ. तावरे व डॉ. हाळनोर यांच्याशी कशा प्रकारे आर्थिक व्यवहार केला?

- अग्रवालने कोणाच्या मदतीने अतुल घटकांबळे याला तीन लाख रुपये दिले?

- अग्रवाल पती-पत्नी कोणाच्या मध्यस्थीने डॉ. तावरेशी संपर्क साधला?

- डॉ. हाळनोर याने अल्पवयीन मुलगा आणि इतरांचे रक्त घेताना वापरलेली सिरीज आणि मुळ रक्ताचा नमुना अग्रवाल पती-पत्नीकडे दिला काय ?

- फरार असताना शिवानी अग्रवाल कुठे होत्या?

- रक्ताचे नमुने घेताना तेथे कोण-कोण उपस्थित होते?

- अग्रवाल यांच्या बंगल्याची झडती होणार

आतापर्यंत यांना झाली आहे अटक :

- अल्पवयीन मुलाचे वडील विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल

- मुलाची आई शिवानी विशाल अग्रवाल

- मुलाचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल

- कोझी पबचे मालक नमन प्रल्हाद भुतडा

- कोझी पबचे व्यवस्थापक सचिन अशोक काटकर

- ब्लॅक पबचे व्यवस्थापक संदीप रमेश सांगळे

- कर्मचारी नीतेश धनेश शेवानी

- ब्लॅकच्या बार काउंटरच व्यवस्थापक जयेश सतीश गावकर

- ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे

- आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर

- शिपाई अतुल घटकांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.