महिलांच्या तक्रारीनंतर 'त्या' मोबाईल ऍपबाबत गुन्हा दाखल : वळसे पाटील

कोरोनासंबंधी राज्य सरकारने घातलेले निर्बंध बैलगाडा शर्यतीलाही लागू
Dilip Walse Patil
Dilip Walse PatilDilip Walse Patil
Updated on

पुणे : महिलांबाबत आक्षेपार्ह व्हिडीओ, मजकुर प्रसारीत करणाऱ्या "सुल्ली डील' या ऍपबाबत महिलांच्या तक्रारी आल्या आहेत. त्यानुसार, मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) गुन्हे शाखेने गुन्हाही दाकल केला आहे. महिलांबाबत कुठलेही वाईट प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, त्याविषयी संबंधीत ट्‌विटर या समाजमाध्यमालाही कळविले आहे, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी रविवारी स्पष्ट केले.

साखर संकुल रविवारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी वळसे पाटील यांनी पत्रकारांशी विविध विषयांवर संवाद साधला. समाजमाध्यमांवर सध्या "सुल्ली डिल' नावाच्या ऍपद्वारे महिलांबद्दल आक्षेपार्ह व्हिडीओल, मजकुर येत असल्याबाबत वळसे पाटील म्हणाले," "संबंधित प्रकार गंभीर आहे. याविषयी महिलांकडून तक्रारी आल्या, तसेच त्यांच्याकडून संतापही व्यक्त करण्यात आला आहे. त्यानुसार, गुन्हा दाखल झाला आहे. तसेच गृह विभागाने ट्‌विटरला कळविले आहे.''

Dilip Walse Patil
आईचा खून केल्या नंतर वडिलांना ही जीवे मारण्याचा प्रयत्न...

आंबेगाव तालुक्‍यातील लांडेवाडी येथील बैलगाडा शर्यतीला ऐनवेळी परवानगी नाकारण्यात आली, त्याविषयी वळसे पाटील म्हणाले, ""सर्वोच्च न्यायालयाने अटी व शर्तीवर बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली आहे. त्यानुसार, संबंधितांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी घेऊन शर्यत आयोजित केली होती. मात्र त्याचवेळी राज्य सरकारने कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रभावामुळे निर्बंध जारी केले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली. निर्बंध शिथील झाल्यानंतर परवानगी मिळेल.''

पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या "त्या' कामगिरीची माहिती घेऊ

चाकण व शेल पिंपळगाव येथे झालेल्या गोळीबाराच्या घटना आणि त्यानंतर तेथे पोचलेल्या पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी गोळीबार करणाऱ्या गुन्हेगारांवर झाडाची कुंडी फेकून मारल्याच्या घटनेबाबत समाजात विचित्र प्रतिक्रीया उमटल्या, याविषयी वळसे पाटील यांना विचारण्यात आले. त्यावेळी "पोलिस आयुक्तांनी घटनास्थळी जाणे गैर नाही, मात्र संबंधित ठिकाणी नेमके काय झाले, याविषयी आपण माहिती घेऊ' असे सांगत पाटील यांनी प्रश्‍नाला बगल दिली.

Dilip Walse Patil
भाजपचे आमदार जयकुमार गोरेही अजितदादांचे 'फॅन'

पोलिसांनी नियमन करावे, वाहनचालकांनीही दंड भरावा

शहरात वाहतुकीचा फज्जा उडाला असताना पोलिस मात्र दंडात्मक कारवाई करण्यात गुंतले आहेत, त्यांच्यावर कारवाई होणार का ? याविषयी वळसे पाटील म्हणाले, "" पोलिसांनी चौकांमध्ये थांबुन वाहतुकीचे नियमन केले पाहीजे. मात्र नागरीकांनीही वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करु नये. उल्लंघन केले असल्यास दंडाची रक्कम भरावी.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.