पुणे : अधिसभेवर दबावासाठी आंदोलनांचे शस्त्र

प्राध्यापकांसह विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी संघटना आक्रमक
organization aggressive
organization aggressive sakal
Updated on

पुणे : कोरोनात पालक गमाविलेल्या विद्यार्थ्यांची शुल्क माफी असो की भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी, अशा विविध मागण्यांसाठी विद्यार्थी आणि प्राध्यापक संघटनांनी बुधवारी विद्यापीठात धरणे आंदोलन दिले. अधिसभेसमोर मागणीपत्र ठेवत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व महाविद्यालयीन अध्यापक संघटना (स्फुक्टो) आणि स्टुडंट हेल्पींग हॅन्डच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

स्फुक्टोच्या वतीने १३ प्रलंबीत मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाचे अध्यक्ष डॉ. एस.पी. लवांडे, स्फुक्टोचे अध्यक्ष डॉ.के.एल. गिरमकर, सरचिटणीस डॉ. व्ही.एम. शिंदे, प्राध्यापक महासंघाचे सरचिटणीस मगन ताटे आदी उपस्थित होते.लवांडे म्हणाले, ‘‘विद्यापीठाचे शैक्षणिक वेळापत्रक पूर्णतः कोलमडले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे ससेहोलपट होत आहे. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक व परीक्षा बाबत मनस्ताप सहन करावा लागत आहे. चालू शैक्षणिक वर्षाच्या परीक्षा वेळेत पूर्ण करून विद्यार्थी हिताच्या दृष्टीने पुढील शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू करावे.’’भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अधिकाऱ्यांची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणीही प्राध्यापक संघटनांच्या वतीने करण्यात आली.

स्टुडंट हेल्पींग हँडच्या वतीने कोरोनात पालक गमाविलेल्या विद्यार्थ्यांची शुल्क माफ करावे, तसेच यासंबंधीची यादी जाहीर करावी या मागण्यांसाठी सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. विद्यापीठाच्या लेखी आश्वासनानंतर रात्री उशिरा हे आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी अध्यक्ष कुलदीप आंबेकर, योगेश केदार, बाळाप्रसाद किसवे, पूजा झोळे, कमलाकर शेटे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.