Garudzep Campaign : आग्रा ते राजगड गरुडझेप मोहिमेची उद्यापासून सुरु

छत्रपती शिवरायांना पुरंदरच्या तहातील शर्तीमुळे आग्र्याला जावे लागले होते. औरंगजेबाच्या तावडीतून सुटून सुखरूप राजगडला येण्याची घटना म्हणजे गरुडझेप होती.
Garudzep Campaign
Garudzep Campaignsakal
Updated on

खडकवासला - छत्रपती शिवरायांना पुरंदरच्या तहातील शर्तीमुळे आग्र्याला जावे लागले होते. औरंगजेबाच्या तावडीतून सुटून सुखरूप राजगडला येण्याची घटना म्हणजे गरुडझेप होती. यास यंदा ३५७ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने उत्तरप्रदेश मधील उच्च शिक्षण मंत्री योगेंद्र उपाध्याय यांच्या हस्ते उद्या गुरुवारी आग्रा येथे शिवज्योत प्रज्वलित करून हि मोहीम राजगडला निघणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या पराक्रमाला अभिवादन करण्यासाठी आग्रा ते राजगड अशी मोहिम पुण्यातील गरूडझेप संस्थेने आयोजित केली आहे. मोहिमेचे यंदा चौथे वर्ष आहे. उद्या गुरुवारी सकाळी आठ वाजता आग्रा येथील लाल किल्ल्यातून राजगडकडे मार्गस्थ होणार आहे.

दरम्यान, कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी भगवा झेंडा दाखवून शुभेच्छा दिल्या. माजी आमदार प्रा.मेधा कुलकर्णी, माजी नगरसेवक योगेश मोकाटे, समीर जाधवराव, संदीप खर्डेकर, इतिहास अभ्यासक डॉ.नंदकिशोर मते, पुनीत जोशी, आनंद पाळंदे, अमित दारवटकर, जुगल राठी, सौरभ कर्डे, ॲड. प्रकाश केदारी, अनिल पवार, दीपक घुले, दुष्यन्त मोहोळ उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील यांनी शुभेच्छा देताना मोहिमेला मागील वर्षीप्रमाणे यंदा हि रुग्णवाहिका दिली. पुढील वर्षी पासून हक्काची रुग्णवाहिका देण्याची घोषणा केली.

तसेच, यंदा शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहे. आग्रा ते पुणे राष्ट्रीय महामार्गला 'शिवस्मरण मार्ग’ असे नामकरण करावे. असा प्रस्ताव इतिहास अभ्यासक डॉ.नंदकिशोर मते यांनी मांडला. संस्थेच्या या मागणीचा माजी आमदार प्रा.मेधा कुलकर्णी यांनी पाठपुरवठा करणार असल्याचे जाहीर केले. सुत्रसंचलन योगिता मराठे यांनी केले.

मोहिमेचे नियोजन दिग्विजय जेधे, किरण पाटील, महेश मालुसरे, विलास मोरे, निलेश मिसाळ, राजू दारकुंडे, मेघराज गोळे, आशा करवंदे, सुनिता नाडगीळ यांनी केले होते.

छत्रपती शिवरायांचा ११ मे १६६६ रोजी आग्र्याच्या दक्षिणेला सहा किलोमीटर अलीकडे ‘मुलुकचंद की सराय’ अथवा ‘सेवला जाट’ येथे मुक्काम होता. त्यांच्यासमवेत शंभूराजे आणि सहकारीही होते. त्यांचे वास्तव्य होते. तेथे सध्या शाळा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आले होते. याची आठवण म्हणून शाळेच्या पटांगणात महाराजांचा अर्धाकृती पुतळा बसविण्यास परवानगी मिळाली आहे. यासाठी, चार वर्षे सातत्याने पाठपुरावा सुरू होता.

- ॲड. मारुती गोळे, संस्थापक अध्यक्ष, गरूडझेप मोहीम

गरुडझेप मोहिमेचा दृष्टीक्षेप

  • आग्र्याहून मागर्स्थ- १७ ऑगस्ट २०२३ रोजी

  • राजगडला पोचणार- २९ ऑगस्ट २०२३ रोजी

  • एकूण अंतर- एक हजार २५३ किलोमीटर

  • चार राज्य- उत्तर प्रदेश, राज्यस्थान, मध्य प्रदेश व महाराष्ट्र

  • मार्गावरील ५७ शहरे, स्थानिक १२५० मावळ्यांचा सहभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.