Agricultural research : साधन-सुविधांच्या अभावामुळे कृषीसंशोधनाला आवश्यक गती नाही; पाटील

फूल संशोधन केंद्राचा तेरावा वर्धापन दिन व शेवंती सप्ताहाचे उद्घाटन
Agricultural research is not required pace due to lack of facilities Patil
Agricultural research is not required pace due to lack of facilities Patilsakal
Updated on

मांजरी : देशाच्या विकासात शेतकऱ्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. आत्मनिर्भर भारताची कल्पना साकारत असताना या घटकाला सहकार्य होण्याची गरज आहे. त्यासाठी या क्षेत्रात अधिकाधिक संशोधन होऊन कृषीपूरक प्रक्रिया उद्योगांना चालना मिळाली पाहिजे. मात्र, अशा संशोधनासाठी सरकारकडून पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने त्याला आवश्यक गती मिळत नाही, अशी खंत महात्मा फुले कृषी विद्यापिठाचे उपकुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी व्यक्त केली.

भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या मांजरी बुद्रुक येथील फूल संशोधन केंद्राचा तेरावा वर्धापन दिन व शेवंती सप्ताहाचे उद्घाटन तसेच फूल शेतीतील प्रयोगशील शेतकऱ्यांचा सत्कार महात्मा फुले कृषी विद्यापिठाचे उपकुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. फूल संशोधन केंद्राचे संचालक डॉ. के. व्ही. प्रसाद, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, सेझच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती मितल हिरेमठ, डॉ. सामी रेड्डी आदी यावेळी उपस्थित होते. उपकुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, "शेतकऱ्यांना केवळ कृषी उत्पादनातून नाही तर त्यापूरक उद्योगातूनही उत्पन्न मिळाले पाहिजे. अनेकदा फुलांसारखे उत्पादन बाजारभाव न मिळाल्याने फेकून दिले जाते. त्यावरील प्रक्रियेतून हा तोटा भरून निघेल. त्यासाठी अधिकाधिक संशोधनाची गरज आहे. शेतकऱ्यांना तशा प्रकारच्या प्रशिक्षणाचीही गरज आहे.'

संस्थेचे संचालक डॉ. प्रसाद म्हणाले, "संस्थेत फुलांचे नवनवीन वान विकसीत करण्याबरोबरच त्याच्या प्रक्रिया उद्योगातून हे उत्पादन अन्नपदार्थात कसे आणता येईल, याबाबतही संशोधन होत आहे. गुलाबाचा वापर हर्बल टी मध्ये कसा करता येईल, यावर सध्या संशोधन सुरू आहे. पर्यावरण विकास व संवर्धनात मधमाश्यांचे असलेले महत्व लक्षात घेऊन त्यांना आकर्षित करून पोषण करणाऱ्या फुलांच्या जाती विकसीत केल्या जात आहे. यातून शेतकऱ्यांना दुहेरी उत्पन्न घेता येऊ शकेल. रंग, सुवासिक द्रव्ये, अत्तर यामध्येही फुलांचा अधिकाधिक प्रभावी वापर करण्याच्या दृष्टीने संशोधन सुरू आहे.'

सेझच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती पाटील म्हणाल्या, "परकीय बाजारात भारतीय कृषीमालाला मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषीमाल निर्यातीमध्ये संधी आहे. त्यासाठी सहकार्य केले जाईल. फूल संशोधन केंद्राच्या व्यासपीठाचा शेतकऱ्यांनी वापर करून घ्यावा.' यावेळी विशाल दरेकर, देवदत्त डुंबरे, महेश डोम, सुनील कांबळी, कुंडलिक निम्हण, मुकूल ठाकर, दिलीप काळे, तानाजी शेंडगे या फूल शेतीतील प्रयोगशील शेतकऱ्यांना यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. डॉ. गणेश कदम, डॉ. पी नवीन कुमार, डॉ. प्रितम जाधव यांनी संयोजन केले. दरम्यान, यावेळी शेतकरी व पाहुण्यांनी फुललेल्या शेवंती प्रक्षेत्राला भेट देऊन पाहणी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()