पुणे - खरीप हंगामासाठी (Kharip Season) शेतकऱ्यांना बियाणे, (Farmer Seeds) खतांसह (Fertilizer) शेतीशी निगडित साहित्य उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रे (Agriculture Service Center) सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत. कोरोनाच्या कालावधीत गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मंगळवारी (ता. १८) हा निर्णय घेतला आहे. (Agricultural service centers in Pune district will remain open during this time)
शेतकऱ्यांच्या दृष्टीने खरीप हंगाम महत्त्वाचा असतो. पावसाला सुरवात झाल्यानंतर बियाणे, खते, कीटकनाशके आणि शेतीशी निगडित साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची कृषी सेवा केंद्रांवर गर्दी होते. अशा परिस्थितीत दुकाने सकाळी सात ते ११ वाजेपर्यंत उघडी ठेवल्यास गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आता दुपारी दोन वाजेपर्यंत कृषी सेवा केंद्र सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
बांधावर बियाणे, खते ऑनलाइन मिळणार
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांना बांधापर्यंत ऑनलाइन विक्रीद्वारे खते, बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. कमीत कमी संपर्कात शेतकऱ्यांना निविष्ठा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ऑनलाइन विक्रीच्या सूचना देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.
कृषी सेवा केंद्रांवर केंद्रचालक, कामगार आणि शेतकऱ्यांना मास्क बंधनकारक
दोन व्यक्तींमध्ये किमान सहा फुटांचे अंतर आवश्यक
शेतकऱ्यांना पूर्वनियोजित वेळ देऊन विक्री करावी
केंद्र चालकांनी विक्रीसाठी इ-कॉमर्सचा वापर करावा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.