माळशिरस - जून महिन्यापासून सुरू झालेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे आजपर्यंत जिल्ह्यात १०,००० पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या ३६४९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांचे झाले आहे. जिल्ह्यातील एकूण शेतकऱ्यांमधील पावणेसात हजार शेतकरी हे केवळ पुरंदर तालुक्यातील बाधित आहेत.
जून महिन्यामध्ये जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात झाल्यानंतर नुकसानीचे प्रमाण अत्यंत कमी आहे. मात्र, जुलै व ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांचे अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यामध्ये अनेक शेतकऱ्यांची जिरायती भागातील पिके नष्ट झाली.