AICTE Placement Portal : ग्रामिण भागातील अभियंत्यांसाठी प्लेसमेंट पोर्टल; दीड हजार उद्योगांचा समावेश

ग्रामिण आणि दुर्गम भागातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना रोजगार शोधून देण्यासाठी 'एआयसीटीई'ने घेतला पुढाकार.
Placement
Placementsakal
Updated on

पुणे - ग्रामिण आणि दुर्गम भागातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना रोजगार शोधून देण्यासाठी खुद्द अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) पुढाकार घेतला आहे. इंटर्नशिप पोर्टलनंतर लवकरच प्लेसमेंट पोर्टल लॉंच करण्यात येईल अशी माहिती एआयसीटीईचे अध्यक्ष प्रा. टी.जी.सितारमण यांनी दिली.

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठात आयोजित एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी एआयसीटीईचे उपाध्यक्ष डॉ. अभय जेरे आणि विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुधीर आगाशे उपस्थित होते. प्रा. सितारमण म्हणाले, ‘इंटर्नशीप पोर्टलद्वारे लाखो विद्यार्थ्यांना इंटर्नशीपची संधी मिळाली.

आता विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष रोजगार मिळावा म्हणून प्लेसमेंट पोर्टल तयार करण्यात आले आहे. त्यावर दीड हजार कंपन्यांनी मागणी नोंदवली आहे. पुढील दोन महिन्याच्या आत हे पोर्टल लॉंच करण्यात येईल.’ पहिल्या टप्प्यात अभियांत्रिकीची पदविका आणि पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याद्वारे रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Placement
Pune Crime: पुण्यात महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर! संगणक अभियंता तरुणीवर रिक्षाचालकाकडून लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

पेटंटसाठी ‘स्वंयम’चा कोर्स -

शैक्षणिक संस्थांना स्वामित्व हक्क सादर (पेटंट) करण्यासाठी कॉर्पोरेट लोकांप्रमाणे हजारो रुपयांचे शुल्क भरायला लागायचे, आता त्यांच्यासाठी ते शुल्क १८०० रुपयांवर येऊन ठेपले आहे, अशी माहिती डॉ. अभय जेरे यांनी दिली.

ते म्हणाले, ‘तंत्र महाविद्यालयांनी पेटंट दाखल करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत असून, मुंबईच्या पेटंट ऑफिसच्या सहकार्याने ‘स्वयंम’ प्लॅटफॉर्मवर कोर्सही लॉंच करण्यात आला आहे. विशेष म्हणजे प्रशिक्षणाबरोबरच महाविद्यालयांना शुल्क प्रतिपुर्तीसाठी मदत केली जाते.’

Placement
Pune News : जी-२० शिक्षण मंत्र्यांची अंतिम बैठक गुरूवारी

ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविण्याबरोबरच मुलाखतीसाठी आवश्यक तंत्र शिकविणे गरजेचे आहे. त्यासाठी सुद्धा या पोर्टलच्या माध्यमातून करण्यात येईल. विशेष म्हणजे कंपन्यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच विद्यार्थ्यांसाठी ते खुले होईल.

- प्रा. टी. जी. सितारमण, अध्यक्ष, एआयसीटीई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.