पुणे : ‘‘देशातील ॲटोमोबाईल क्षेत्राची अर्थव्यवस्था यापूर्वी सात लाख कोटी रुपयांच्या घरात होती. त्यावेळी या क्षेत्रात भारताचा क्रमांक सातवा होता. आता भारत जपानला मागे टाकून तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. जगात ॲटोमोबाईल क्षेत्रात अमेरिका (७८ लाख कोटी रुपये), चीन (४४ लाख कोटी रुपये) आणि भारत (२२ लाख कोटी रुपये) येथील अर्थव्यवस्था अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकावर आहे.