- प्रसाद कानडे
पुणे - पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलमध्ये सर्व दहा एरोब्रिजचा पूर्ण वापर प्रवाशांकडून सुरू झाला आहे. त्यामुळे हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांची ‘पार्किंग बे’पासून टर्मिनलपर्यंत होणारी पायपीट थांबली आहे.
विमानतळावर प्रवाशांना आता चालत जावे लागत नाही. त्यांची सुरक्षितताही त्यामुळे वाढली आहे. यापूर्वी काही दिवसांपर्यंत एरोब्रिजचे भाडे द्यावे लागते म्हणून विमान कंपन्या त्याचा कमीत कमी वापर करण्यावर भर देत होत्या. त्यामुळे रोज शेकडो प्रवाशांना ‘पार्किंग बे’पासून टर्मिनलच्या इमारतीपर्यंत चालत जावे लागत होते. यात अपघाताचा धोका होता. अखेरीस विमानतळ प्रशासनाने आग्रही भूमिका घेतल्याने सर्वच विमान कंपन्यांना एरोब्रिजचा वापर अनिवार्य झाला आहे.