Dilip Walse Patil : प्रदूषणाची वाढती पातळी धोकादायक, प्रभावी जनजागृतीची गरज

'नवी दिल्लीत वाढत्या प्रदुषणाच्या समस्येमुळे चार दिवस शाळा बंद ठेवाव्या लागल्या तशीच परिस्थिती आता मुंबई पुण्यासह मोठ्या शहरामध्ये निर्माण होत आहे.
Dilip Walse Patil
Dilip Walse Patilsakal
Updated on

मंचर - 'नवी दिल्लीत वाढत्या प्रदुषणाच्या समस्येमुळे चार दिवस शाळा बंद ठेवाव्या लागल्या तशीच परिस्थिती आता मुंबई पुण्यासह मोठ्या शहरामध्ये निर्माण होत आहे. लहानमुले व ज्येष्ठ नागरिकांना श्वास घेताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यातून अनेक आजार उदभवू शकतात.

दिवसेंदिवस प्रदूषणाची वाढत चालेली पातळी रोखण्यासाठी व प्रदूषण मुक्त परिसर होण्यासाठी मोठ्याप्रमाणात जणजागृतीची गरज आहे.' असे राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

मंचर (ता.आंबेगाव) येथे उपजिल्हा रुग्णालयात रविवारी (ता.१२) रजनी प्रकाश फाऊंडेशन व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने दिव्यांग, आशा सेविका, सफाई कामगार, आरोग्य कर्मचारी आदी ५१० जणांना दिवाळी फराळ वाटप वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पांडुरंग महाराज येवले, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, रजनीबेन शहा, नेत्रा शहा, स्विटी शहा, प्रशांत बागल, प्रकाश घोलप, अजय घुले, डॉ.तुषार पवार, संजय बाणखेले, संतोष भोर उपस्थित होते.

वळसे पाटील म्हणाले, 'कोरोनाच्या महाभयंकर संकटात उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल होणाऱ्या सर्व रुग्णांना दररोज दोन वेळा जेवण व नाष्टा देण्याची व्यवस्था देवेंद्र शहा व रजनी प्रकाश फौंडेशनने केली आहे. शहा कुटुंबाचे सामाजिक क्षेत्रातील योगदान इतरांना प्रेरणा देणारे आहे.'

देवेंद्र शहा म्हणाले, 'वळसे पाटील यांच्या प्रयत्नातून उपजिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅन व डायलिसिस सुविधा मोफत उपलब्ध झाल्या आहेत. नजीकच्या काळात एमआरआय सुविधा उपलब्ध होण्यासाठी वळसे पाटील यांचे प्रयत्न सुरु आहेत.'

नीळकंठ काळे, सुहास बाणखेले, लक्ष्मन थोरात यांनी व्यवस्था पहिली. सर्वाना भोजन देण्यात आले. रायगड जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास दवमाने, डॉ .शिवाजीराव जाधव, दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष समीर टाव्हरे यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन दत्ता थोरात तर आभार जगदीश घिसे यांनी मानले.

'स्वच्छतागृहासाठी निधी दिला तर आमची नावे तेथे लावाच असा आग्रह जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार धरतात पण देवेंद्र शहा, कुमारपाल समदडीया, नरेंद्र समदडीया यांनी पुढाकार घेतला. जैन समाजाचा किंवा आमच्या नावाचा कोठेही फलक लावू नका असे सांगून मंचर उपजिल्हा रुग्णालयासाठी चार ते पाच कोटी रुपये किमितीची जागा विनामुल्य दिली. त्यामुळेच हे रुग्णालय उभे राहिले आहे. विनामुल्य सिटी स्कॅन सुविधा सुरु झाली असून ही सेवा २४ तास उपलब्ध राहणार आहे. गरजू रुग्णांनी तपासणी करून घ्यावी.'

- दिलीप वळसे पाटील, सहकार मंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.