राज्यासह देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो, मात्र या दिवसांमध्ये होणाऱ्या आतिषबाजीमुळे हवेची गुणवत्ता मात्र ढासळते. दिवाळीनंतर पुणे आणि मुंबई या शहरांमधील हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात ढासळल्याचे समोर आले आहे. पुणे शहरातील हडपसर भागात तर हवा धोकादायक पातळीवर पोहचली आहे. यामुळे नागरिकांचे श्वसनाचे आजार बळावण्याचा धोका आहे.