Pune News : अजित पवारांचे आरोप बेदखल, तर पटेलांना टोला; शरद पवारांच्या निशाण्यावर बंडखोर नेते

‘‘‘मला या गोष्टी पहिलेंदाच समजल्या असल्या तरी त्यावर उत्तर देण्याची गरज नाही’’
ajit pawar allegation dismissed praful patel criticize ncp leader Sharad Pawar politics
ajit pawar allegation dismissed praful patel criticize ncp leader Sharad Pawar politicsEsakal
Updated on

Pune News: राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या आरोपांना आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बेदखल केले.

‘‘‘मला या गोष्टी पहिलेंदाच समजल्या असल्या तरी त्यावर उत्तर देण्याची गरज नाही’’ असे पवार यांनी सांगताच दुसरे बंडखोर नेते प्रफुल्ल पटेल यांनाही लक्ष्य केले. ‘‘पटेल यांनी त्यांच्या आत्मचरित्रात इडीचे अधिकारी आले होते का, त्यांच्या घराचे किती मजले इडीने ताब्यात घेतले, यावरही लिखाण करावे. त्यामुळे आमच्या ज्ञानात भर पडेल,’’ अशी खोचक टीका पवार यांनी केली.

शरद पवार यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची निसर्ग मंगल कार्यालय येथे बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, एकनाथ खडसे, अनिल देशमुख आदी उपस्थित होते.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे कर्जत येथे नुकतेच मंथन शिबिर झाले. त्यामध्ये अजित पवार यांनी'‘पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर शरद पवार यांनीच राजीनामा परत घेण्यासाठी आंदोलन करायला लावले असा आरोप केला. जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख यांच्यावरही टीका केली होती. त्यावर आज शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले.

पवार म्हणाले, ‘‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना कोणी केली, तिचा अध्यक्ष कोण आहे, हे सर्वांना माहिती आहे. पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याबाबत कोणाशी चर्चा करण्याची मला गरज वाटली नाही.

मी जेव्हा राजीनाम्याची घोषणा केली तेव्हा राजीनामा मागे घ्यावा म्हणून आंदोलन केल्याचे तुम्हीही पाहिले. मला बदल करायचा असेल तर आनंद परांजपे, जितेंद्र आव्हाड यांची परवानगी घ्यायची गरज नाही. माझ्यात निर्णय घेण्याची कुवत आहे.

ज्यांना भाजपसोबत जायचे असले तर जा पण आम्ही येणार नाही असे मी यापूर्वीच सांगितले होते. अनिल देशमुखही याच मताचे होते. भाजपसोबत जाणे हा रस्ता आपला नाही, असेही देशमुख यांनी सांगितले होते.

जनतेने आम्हाला भाजपच्या विरोधात काम करण्याची संधी दिली, त्यांची फसवणूक करण्यासारखे आहे. अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याची भूमिका का घेतली? हे जनतेला माहीत आहे, अशी टीका पवार यांनी केली.

इडीने किती मजले ताब्यात घेतले ते लिहा

आत्मचरित्र लिहिले तर खळबळ असा इशारा प्रफुल्ल पटेल त्यांच्या भाषणातून देत आहेत. त्यावर पवार म्हणाले, पटेल यांच्या पुस्तकाची मी वाट पाहत आहे. त्यात त्यांनी लोक पक्ष सोडून का जातात?

इडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरातील किती मजले ताब्यात घेतले, कोणत्या कारणासाठी घेतले यावरही एक प्रकरण लिहावे. ते वाचून आमच्याही ज्ञानात भर पडेल. भाजपसोबत जाण्यास माझा विरोध असताना पटेल मात्र त्यासाठी आग्रह करत होते, त्यावर तुम्हाला जायचे असेल तर जा असे मी त्यांना सांगितले, असे पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.