Ajit Pawar Baramati Rally: पुणे-नगर-नाशिक रेल्वेचा प्रश्न लवकरच सुटणार? अजितदादांनी दिलं 'हे' आश्वासन

बारामतीत जाहीर सभेत बोलताना अजितदादांनी विविध विकास कामं मार्गी लावण्याची आश्वासनं दिली.
Ajit Pawar Baramati Rally: पुणे-नगर-नाशिक रेल्वेचा प्रश्न लवकरच सुटणार? अजितदादांनी दिलं 'हे' आश्वासन
Updated on

बारामती : पुणे-नगर-नाशिक रेल्वे मार्ग हा गेल्या अनेक वर्षांपासून रखडला आहे, हा रेल्वे मार्गाचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे. कारण उपमुख्यमंत्री अजित पवार या कामाला वेग देणार असल्याचं सांगितलं. त्याचबरोबर गरज पडल्यास दिल्लीला जाणार असल्याचंही ते म्हणाले. बारामतीत जाहीर सभेत बोलताना त्यांनी हे मोठं आश्वासन दिलं आहे. (Ajit Pawar Baramati Rally Pune Nagar Nashik railway problem will be solved soon)

Ajit Pawar Baramati Rally: पुणे-नगर-नाशिक रेल्वेचा प्रश्न लवकरच सुटणार? अजितदादांनी दिलं 'हे' आश्वासन
Jawan Song: जवानच्या 'नॉट रमैय्या वस्तावैया' गाण्याचा टीझर लॉन्च; शाहरुखचा डान्स अन् म्युझिकची जबरदस्त ट्रिट

अजित पवार म्हणाले, तुम्ही पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर काय करणार? असं मला लोक विचारतात. तर मी त्यांना सांगू इच्छितो. मी पुणे-नगर-नाशिक हा रेल्वेमार्ग थोडासा रेंगाळलेला आहे, त्या कामाला गती देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. गरज पडल्यास दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह किंवा रेल्वे मंत्र्यांना भेटेन. त्यांच्याकडं पाठपुराव्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. (Latest Marathi News)

Ajit Pawar Baramati Rally: पुणे-नगर-नाशिक रेल्वेचा प्रश्न लवकरच सुटणार? अजितदादांनी दिलं 'हे' आश्वासन
Sanjay Raut on Sharad Pawar: अजित पवारांविरोधात शरद पवारांचा 'गनिमी कावा'; संजय राऊतांचा मोठा दावा

त्याचबरोबर दळणवळणचा प्रश्न महत्वाचा आहे. त्यामुळं पुण्यासाठी विमानतळ, मेट्रो, रस्ते, चांगल्या प्रकारच्या सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार कारण हे केल्याशिवाय शहराचा आणि जिल्ह्याचा कायपालट होणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.