Nitin Gadkari : ''दोन्ही दादांनी मिळून चांदणी चौकाचे नाव ठरवावे, मी मंजुरी देतो'' नितीन गडकरी नेमकं काय म्हणाले?

Nitin Gadkari
Nitin Gadkari eSakal
Updated on

Chandani Chowk Inauguration : अजित पवारांनी सत्तापक्षाला समर्थन दिल्यापासून भाजपमध्ये अंतर्गत अस्वस्थता असल्याचं बोललं जातं. विशेषतः पूर्वीचे कट्टर विरोधक असलेले चंद्रकांत पाटील आणि अजित पवार यांच्यात कसा समेट होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पुण्यातील बहुचर्चित चांदणी चौकातील नव्या उड्डाणपुलाचे आज केंद्रीय वाहतूक आणि रस्ते मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपचे इतर नेते उपस्थित होते. पुण्याची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हवेतून चालणाऱ्या गाड्यांची योजना आणणार असल्याचं आश्वासन गडकरी यांनी यावेळी भाषणात दिलं.

Nitin Gadkari
Chandani Chowk Inauguration: पुण्यातून पेट्रोल-डिझेल हद्दपार करणार; गडकरींची घोषणा

अजित पवारांनी सत्तापक्षाला समर्थन दिल्यापासून मूळ भाजप नेत्यांची घुसमट होणार? अशी शक्यता राजकीय जाणकार वर्तवतात. त्यातच चंद्रकांत पाटील आणि अजित पवार यांच्यापैकी पुण्याचं पालकमंत्रीपद कुणाकडे राहणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवाय पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही.

विशेष म्हणजे १५ ऑगस्ट रोजी झेंडावंदन अजित पवारांच्या हस्ते होणार, असं जाहीर झालं होतं. नंतर मात्र अजित पवारांनी स्पष्टीकरण देत राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण होईल, असं सांगितलं. त्यामुळे चंद्रकांत पाटील आणि अजित पवार यांच्यातला संभाव्य वितुष्टवाद पुढे ढकलला आहे.

Nitin Gadkari
Chandni Chowk Flyover : चांदणी चौक पुलाच्या लोकार्पणावेळी गडकरी मेधा कुलकर्णींना विसरले नाहीत; सांगितली 'ती' आठवण

त्यातच आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चांदणी चौकाच्या संदर्भात दोन्ही दादांनी निर्णय घ्यावा, मी मंजुरी देतो असं म्हणून एक प्रकार समेट घडवून आणण्यचा प्रयत्न केला आहे. नितीन गडकरी म्हणाले की, आता चांदणी चौकाचे नवीन नाव दोन्ही दादांनी म्हणजेच चंद्रकांत पाटील आणि अजित पवार यांनी मिळून ठरवावे. मी त्याला मान्यता देईल. गडकरींच्या या विधानामुळे उपस्थितांच्या भूवया उंचावल्या होत्या.

गडकरी पुढे म्हणाले की, मंत्री झाल्यानंतर अनेकदा पुण्यात आलो. पुणेकरांकडून तीन मागण्या होत होत्या. पुणे मेट्रोचे काम पूर्ण करण्यात यावे. तसेच एअरपोर्टचा विकास करण्यात यावा आणि चांदणी चौक पुलाचे काम करण्यात यावे.

यातील दोन गोष्टी पूर्ण झाल्यात, आता मेट्रोचे कामही पूर्ण होत आहे. यासाठी मी पुणेकरांचं मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. पूल बांधण्यात अनेक अडचणी आल्या. एनडीएने १७ कोटी रुपये वसूल करुन घेतले. अनेक लोकांचे वाद होते. त्यावेळी मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी पुलासाठी जमीन घेण्याचं काम केलं. त्यासाठी त्यांचेही धन्यवाद.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.