Political News : 'तो' पराभव अजित पवारांच्या जिव्हारी

Ajit Pawar
Ajit Pawaresakal
Updated on
Summary

'अजित पवार माझ्या विषयी बोलले नसते तर मी शांत राहिलो असतो. मात्र, त्यांच्या बोलण्याचा मला फायदाच झाला.'

पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (Pune District Central Co Operative Bank Election) संचालक मंडळाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) निर्विवाद वर्चस्व गाजवलं. 21 पैकी तब्बल 19 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जिंकून आले, तर दोन जागांवर भाजपनं (BJP) विजय मिळवला.

राष्ट्रवादी काँग्रेसनं 19 जागा जिंकल्या असल्या तरी चर्चा झालीय भाजपनं जिंकलेल्या जागांची. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या प्रदीप कंद (Pradeep Kand) यांनी सुरेश घुले यांचा 14 मतांनी पराभव केला. हा पराभव अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. कारण, निवडणुकीच्या प्रचारावेळी प्रदीप कंद यांना जागा दाखवून देण्याचं आवाहन अजित पवार यांनी केलं होतं.

Ajit Pawar
झुंड में तो सूअर आते हैं, शेर अकेला ही आता है!

या निकालावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, जिल्हा बँक ताब्यात आली. मात्र, त्यात आम्हाला एक जागा गमवावी लागली. मला 'त्या' एका जागेबाबत शंका होतीच, अशी परखड भावना अजितदादांनी बोलून दाखवली. बाकी सर्वच जागा चांगल्या मतांनी निवडून आल्या आहेत. निवडून आलेल्या सर्वांचं अभिनंदन, असं म्हणत त्यांनी कौतुक केलं. अजित पवार माझ्या विषयी बोलले नसते तर मी शांत राहिलो असतो. मात्र, त्यांच्या बोलण्याचा मला फायदाच झाला, त्यामुळं मी त्यांचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया पुणे जिल्हा सहकारी बँकेत निवडून आलेले प्रदीप कंद यांनी दिलीय. प्रदीप कंद जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष असून आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, पण त्यांनी भाजप प्रवेश केल्यामुळे अजित पवार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.

Ajit Pawar
निवडणुकीत उदयनराजे-शिवेंद्रराजेंच्या आघाड्या आमने-सामने भिडणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.