Video : चंपा आता कावळा, जित्याही आणि चोरही : अजित पवार

Ajit Pawar criticize Chandrakant Patil in Pune
Ajit Pawar criticize Chandrakant Patil in Pune
Updated on

पुणे : 'कावळ्याच्या शापाने गाय काही मरत नाही' आणि 'जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही' त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी काही बोलले तर फरक पडत नाही, असे उत्तर अजित पवार यांनी बालेवाडी येथे दिले.

गृहमंत्री खाते राष्ट्रवादीला देऊ नये, असे विधान पाटील यांनी केले. त्यावर अजित पवार यांनी उत्तर दिले. 105 आमदार असूनही सत्ता मिळाली नाही. त्यामुळे पाटील असे बोलत असावे. ते ज्येष्ठ नेते आहेत. असा टोलाही पवार यांनी लगावला. तसेच सीसीटीव्ही कॅमरे सेनेच्या भवनापुढे लावले जातील यावर पवार म्हणाले की, चोराच्या मनात चांदणे अशी म्हण पवार यांनी वापरली.

'चंपा आता कावळा, जित्याही आणि चोर ही' असे अजित पवारांनी म्हणल्यावर एकच हशा पिकला. मी मंत्रिमंडळात आहे की नाही हे आत्ताच नाही सांगणार, असेही ते यावेळी म्हणाले. 

पुणे जिल्हा शिक्षण मंडळ वतिने शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बालेवाडी येथे शिवछत्रपती क्रीडा क्रीडांसंकुल मध्ये जिल्हा स्पर्धचे आयोजन 27 ते 28 डिसेंबर केले आहे. त्याचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले. दिलीप वळसे पाटील, कुलगुरु नितीन करमाळकर व इतर उपस्थित होते. त्यानंतर ते पत्रकारांसह बरोबर बोलत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.