मोदींच्या कार्यक्रमात अजित पवारांना बोलू दिलं नाही; सुप्रिया सुळेंनी घेतला आक्षेप

देहूमध्ये संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालं.
Ajit Pawar_PM Modi_Shila Mandir Dehu
Ajit Pawar_PM Modi_Shila Mandir Dehu
Updated on

पुणे : देहूमध्ये संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालं. यावेळी आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावर उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांनी कार्यक्रमादरम्यान भाषण केलं पण अजित पवार यांनी भाषण केलं नाही. त्यामुळं यावर आता आक्षेप घेण्यात आला आहे. सुप्रिया सुळे यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. (Ajit Pawar did not speak during Modi program in Dehu Question posed by Supriya Sule)

Ajit Pawar_PM Modi_Shila Mandir Dehu
शिळा मंदिर केवळ भक्ती-शक्तीचं केंद्र नव्हे सांस्कृतीक भविष्य घडणारी संस्था - PM मोदी

सुप्रिया सुळे म्हणाल्या, अजित पवारांच्या कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार, अजित दादांना भाषण करायचं होतं, याबाबत पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहिण्यात आलं होतं. कारण ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. पण पीएमओकडून लेखी उत्तरात त्यांच्या भाषणाला ओके आलं नाही. हे अतिशय गंभीर असून मला स्वतःला वेदना देणारं आहे. कारण महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याचा, पालकमंत्र्याचा आणि आमच्या नेत्याचा प्रोटोकॉलनुसार सन्मान झालेला नाही. त्यामुळं हे अतिशय धक्कादायक आणि अयोग्य आहे. हा महाराष्ट्राचा अपमान आहे.

Ajit Pawar_PM Modi_Shila Mandir Dehu
CM योगी 'सुपर सरन्यायाधीश'; बुलडोझर प्रकरणावरुन ओवैसींची टीका

आमच्या महाराष्ट्राचा आमचा उपमुख्यमंत्री जर व्यासपीठावर असेल तर तिथं भाषण करणं हा त्यांचा अधिकार आहे. त्यावेळी फडणवीसांना भाषण करु द्यायचं की नाही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण हे जे झालं ते अयोग्य असल्याचं माझं मत आहे. त्यानंतर प्रोटोकॉलप्रमाणं लोहगाव विमानतळ ते देहू आणि देहू ते मुंबई या दोन्ही प्रोटोकॉल प्रमाणं अजित दादांना हजर राहणार हा प्रोटोकॉल आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

भाषणाला दिल्लीतूनच परवानगी दिली नाही - देहू संस्थान

या प्रकरणावर भूमिका स्पष्ट करताना देहूच्या मंदिर संस्थांचं प्रमुख नितीन महाराज मोरे म्हणाले, "हा आमचा धार्मिक कार्यक्रम होता. पंतप्रधान मोदींना मुंबईत संध्याकाळी कार्यक्रम होता. त्यानुसार व्यासपीठावरील प्रोटोकॉल आम्हाला दिल्लीवरुन आले होते. त्यामध्ये संस्थानचा संबंध येत नाही. संस्थाननं हा कार्यक्रम संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पणासाठी घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.