Pune Porsche Accident : कारण नसताना गैरसमज निर्माण केला जातोय; पोर्शे अपघात प्रकरणी अजित पवारांचं वक्तव्य

Pune Porsche Accident : मी माझं काम करत असतो, मला माध्यमांच्या पुढे यायला आवडत नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात दिली.
Pune Porsche Accident : कारण नसताना गैरसमज निर्माण केला जातोय; पोर्शे अपघात प्रकरणी अजित पवारांचं वक्तव्य
Updated on

पुणे: पुण्यातील घडलेल्या घटनेवर मी लक्ष ठेऊन आहे. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. या प्रकरणात पालकमंत्र्यांचे लक्ष नाही असा कारण नसताना गैरसमज निर्माण केला जात आहे. मी माझं काम करत असतो, मला माध्यमांच्या पुढे यायला आवडत नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात दिली.

कल्याणीनगर येते अल्पवयीन मुलाने पोर्श या आलिशान कारने धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला. पबमध्ये दारू पिऊन हा प्रकार घडलेला असतानाही त्या मुलास अवघ्या काही तासात निबंध लिहिण्याची शिक्षा देत जामीन देण्यात आला. त्यामुळे देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. असे असताना आज अजित पवार यांनी पहिल्यांदाच या प्रकरणावर भाष्य केले.

पुण्यात बोलताना अजित पवार म्हणाले, “कल्याणीनगर येथे घडलेली घटना गंभीर असून, यात राजकीय व्यक्तीचा हस्तक्षेप नाही. अशा घटना यापुढे घडू नये. कायदा सुव्यवस्था राखणं हे पोलिसांची जबाबदारी आहे. जे दोषी असतील, त्यांना कायद्यानुसार शिक्षा व्हायला हवी. पोलिस आयुक्तांसोबत चर्चा सुरु आहे.

आरोपीला जामीन मिळाला आहे, पण जामीन कसा द्यावा, हा न्यायालयाचा विषय आहे. पोलिसांनी पारदर्शकता ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री म्हणून मी, आम्ही तिघेही पहिल्या दिवसापासून लक्ष ठेवून आहोत.

Pune Porsche Accident : कारण नसताना गैरसमज निर्माण केला जातोय; पोर्शे अपघात प्रकरणी अजित पवारांचं वक्तव्य
Pune Porsche Accident : पुण्यातल्या 'ड्रंक अँड ड्राईव्ह'प्रकरणी तपास अधिकारी बदलला; 'यांच्याकडे' दिली जबाबदारी

आचारसंहिता शिथिल करा

महाराष्ट्र पाच टप्प्यात ४८ लोकसभा मतदारसंघातील मतदान होऊन गेले आहे. आता मतमोजणीसाठी काही दिवस शिल्लक आहेत. राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.

Pune Porsche Accident : कारण नसताना गैरसमज निर्माण केला जातोय; पोर्शे अपघात प्रकरणी अजित पवारांचं वक्तव्य
Pune Car Accident: आरोपीनं जाणूनबुजून दोघांना चिरडलं?, पोलीस आयुक्त नेमकं काय म्हणाले?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.