पडळकरांना विनाश काले विपरीत बुद्धि सुचतेय; अजित पवार

Ajit Pawar Gives Statement on gopichand Padalkar
Ajit Pawar Gives Statement on gopichand Padalkar
Updated on

पुणे : जेजुरी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. या संदर्भात भाजपच्या गोपीचंद पडळकर यांनी पवार हे महाराष्ट्र लागलेला शाप आहे, असे वक्तव्य केले होते. याबाबत उपमुख्यमंत्री पवार यांनी पडळकर यांच्यावर सडकून टीका केली. "'पडळकर यांचे वक्तव्य म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी आहे. ज्यांचे निवडणुकीत प्रमुख पक्षाचे उमेदवार असूनही डिपॉझिट जप्त झाले, अशांना जास्त महत्त्व देऊ नये. ज्यांना लोकांनी नाकारले, त्यांची एवढी काय नोंद घेता? त्यांना फारसे महत्व देण्याचे कारण नाही.''अशा शब्दात अजित पवार यांनी त्यांचा समाचार घेतला. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 

पुजा चव्हाण आत्महत्येच्या चौकशी बाबत विचारले असता पवार म्हणाले, ''आत्महत्या झाल्यानंतर पोलिस तापस करत असतात  या प्रकरणाचीही चौकशी होईल. विरोधी पक्ष नेत्यांना काही काम नसल्यामुळे असे आरोप करतात. या आरोपात तथ्य असेल तर लक्ष घातले पाहिजे. ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत त्याबाबात विचारले असता ते म्हणाले की सर्व चौकशी झाल्यावर अहवाल देऊ.''

राज्यपालांना विमानातून उतरविल्या प्रकरणी ठाकरे सराकारवर भाजपकडून टिका केली जात आहे. याबाबत बोलताना पवार म्हणाले, ''राजभवन सचिवालयाने विमान उपलब्धतेची खातर जमा करायला हवी होती. परवानगी मिळाली नसल्याची नोटीस आदल्या दिवशी दिली होती अशी प्रेस नेट सीएम ऑफिसकडून निघाली आहे.''

शरद पवारांच्या आधीच केला पुतळ्याच्या अनावरणाचा प्रयत्न; पडळकरांवर गुन्हा दाखल


''धनंजय मुंडे किंवापुजा चव्हाण प्रकरणी वारंवार आरोपींना पाठी घालण्याचे काम महाविकास आघाडी सरकार करत आहे.''असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला होता त्याला प्रत्त्युतर देताना पवार म्हणाले,  मुंडे प्रकरणा ज्यांनी तक्रार केली ज्यांनी तक्रार दिली त्यांनी स्वत:च मागे घेतली. कोणत्याही दबावाला बळी न पडता स्टेटमेंट केले. असे सांगितल्यावर आरोपींना पाठीशी घालण्याचा मुद्दाच येत नाही. प्रश्न हा विषय तिथेच संपला.  

आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदर तालुक्यातच
पुरंदर तालुक्यात काही शेतकऱ्यांनी विमानतळाच्या जागेला विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमानतळ नेमकी कोठे होणार याबाबत तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत. यासंदर्भात पवार म्हणाले, पुरंदर तालुक्यात यापूर्वी विमानतळासाठी निश्चित केलेल्या जागेच्या तुलनेत नवीन जागा ही उपयुक्त आहे. त्या ठिकाणी खाचखळगे कमी आहेत. बागायती क्षेत्र कमी आहे आणि विमानाच्या लँडिंग आणि टेकऑफसाठी ही उपयुक्त आहे. त्यामुळे नवीन विमानतळ हे पुरंदर तालुक्यातच होईल.
 

सिरम इन्स्टिट्यूटला लागलेली आग शॉर्टसर्किटमुळे

सध्या कोरोना लसीचे उत्पादन घेत असलेल्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये काही दिवसापूर्वी आग लागून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. ही आग शॉर्टसर्किटमुळेच लागली होती. तसा अहवाल प्राप्त झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.