Ajit Pawar : कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी अजित पवार गुरुवारी बारामतीत पोलिस अधिकाऱ्यांची घेणार बैठक

baramati latest News | शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी (ता. 3) बारामतीत वरिष्ठ पोलिस अधिका-यांची बैठक बोलाविली आहे.
Ajit Pawar hold meeting with police officials in Baramati to review law and order issues
Ajit Pawar hold meeting with police officials in Baramati to review law and order issuessakal
Updated on

बारामती- शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी (ता. 3) बारामतीत वरिष्ठ पोलिस अधिका-यांची बैठक बोलाविली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंकज देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड यांच्यासह प्रमुख वरिष्ठ पोलिस अधिकारी या बैठकीस उपस्थित राहणार आहेत.

गेल्या काही दिवसात बारामतीत घडलेल्या विविध घटनांच्या पार्श्वभूमीवर बारामतीच्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत मोठी चर्चा झाली. शहरातील अनेक चो-यांचा तपास लागतच नाही, पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. अनेक राजकीय पक्षांनीही पोलिसांच्या कामगिरीविषयी असमाधान व्यक्त केले.

दोन मुलींवर अत्याचार, विदयार्थ्यांच्या खूनाच्या घटनेसह, वाढत्या चो-या व चो-यांचा न लागणारा तपास, वाहतूकीच्या कोंडीचा कायम असलेला प्रश्न यासह अनेक मुदयांवर अजित पवार पोलिस प्रशासनाला धारेवर धरतील अशी अपेक्षा आहे.

बारामती शहर व तालुका या दोन्ही पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिका-यांची सुमार कामगिरी, माध्यमांपासून घडलेल्या घटना लपवून ठेवणे, माहितीच बाहेर येऊ न देणे या सह पोलिस अधिका-यांचा जनतेशी संपर्कच नसणे या मुद्यांवर देखील उपमुख्यमंत्री वरिष्ठ अधिका-यांशी चर्चा करतील.

जिल्हा पोलिस अधीक्षकांचे दुर्लक्ष....

बारामतीत कितीही गंभीर घटना घडली तरी जिल्ह्याचे पोलिस प्रमुख म्हणून पोलिस अधीक्षक बारामतीत येतच नाहीत, अशीही एक तक्रार आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक असल्याने पोलिस अधीक्षक बारामतीकडे फारसे लक्षच देत नाहीत, अशी बारामतीकरांची भावना आहे.

उपमुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ असतानाही चांगले अधिकारी पोलिस ठाण्यांना दिले जात नसल्याचीही चर्चा आहे. तालुका पोलिस ठाण्याची तर दयनीय अवस्था झालेली आहे, शहर पोलिसांची कामगिरीही सुमार आहे. गुन्ह्यांचा तपासच दोन्ही पोलिस ठाण्यांकडून होतच नसल्याने बारामतीकरांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.