नवी दिल्ली : कोरोनावरील उपचारासाठीची औषधे, वैद्यकीय उपकरणे तसेच लस यावरील जीएसटी कपातीचा आढावा घेण्यासाठी नेमलेल्या आठ सदस्यीय मंत्रिगटात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचाही समावेश करण्यात आला आहे. मेघालयाचे मुख्यमंत्री कोनराड संगमा हे या मंत्रिगटाचे समन्वयक असतील.
जीएसटी परिषदेच्या काल झालेल्या ४३ व्या बैठकीमध्ये कोरोनाप्रतिबंधक लस, औषधे, टेस्टिंग किट, वैद्यकीय ऑक्सिजन, ऑक्सिमीटर, हँड सॅनिटायजर, कॉन्सन्ट्रेटर, व्हेन्टिलेटर, ऑक्सिजन जनरेटर, पीपीई किट, एन-९५ मास्क, सर्जिकल मास्क, तापमापक उपकरण यासारख्या कोरोनावरील उपचारसाहित्यावरील जीएसटी पूर्णपणे हटविण्याची आग्रही मागणी राज्यांची प्रामुख्याने कॉंग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांची होती. मात्र यावर केंद्र आणि राज्यांमध्ये सहमती होऊ शकली नाही.
अखेर या उपकरणांवरील जीएसटीचे दर कमी करावे यावर एकमत झाल्यानंतर जीएसटी दराचा आढावा घेण्यासाठी मंत्रिगट नेमण्याचे ठरले. त्यापार्श्वभूमीवर आज मंत्रिगटातील सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली. दरम्यान, जीएसटी परिषदेच्या बैठकीत राज्यांच्या जीएसटी भरपाईसाठी केंद्र सरकारने १.५८ लाख कोटीचे कर्ज घेण्याचे तसेच जीएसटी भरपाई उपकर आकारणीचा कालावधी ठरविण्यासाठी जीएसटी परिषदेची स्वतंत्र बोलावण्याचेही ठरले. तर आयात उपकरणे, औषधांना ३१ ऑगस्टपर्यंत आयजीएसटीमध्ये सवलत देण्याचा त्याचप्रमाणे काळ्या बुरशीवरील उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या अॅम्फोटरीसीन बी या औषधासाठी देखील ३१ ऑगस्टपर्यंत आयजीएसटीमध्ये सवलत देण्याचा निर्णय जीएसटी परिषदेने केला होता.
मेघालयाचे मुख्यमंत्री कोनराड संगमा हे या मंत्रिसमूहाचे समन्वयक असतील. तर गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गोव्याचे परिवहन मंत्री मौविन गोदिन्हो, केरळचे अर्थमंत्री के. एन. बालगोपाल, ओडिशाचे अर्थमंत्री निरंजन पुजारी, तेलंगणचे अर्थमंत्री टी. हरीश राव आणि उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री सुरेश कुमार खन्ना हे सदस्य असतील. आठ जूनपर्यंत अहवाल आणि शिफारसी सादर करण्यास या मंत्रिगटाला सांगण्यात आले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.