Baramati Loksabha : ज्यांना पदे दिली त्यांच्यावर मी हक्क गाजविणार ; अजित पवार

विकासासाठी घड्याळाला मत द्या अशी विनंती आम्ही मतदार राजाला करणार आहे. कार्यकर्त्यांचे मी समजू शकतो. तो कुठल्याही पक्षाचे काम करू शकतो.
Baramati Loksabha ajit pawar
Baramati Loksabha ajit pawar sakal
Updated on

केडगाव : विकासासाठी घड्याळाला मत द्या अशी विनंती आम्ही मतदार राजाला करणार आहे. कार्यकर्त्यांचे मी समजू शकतो. तो कुठल्याही पक्षाचे काम करू शकतो. परंतू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून व माझ्या प्रयत्नातून ज्यांना पदे दिली त्यांच्यावर मी हक्क गाजविणार आहे. असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.

वाखारी ( ता.दौंड ) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकर्ता संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी अजित पवार बोलत होते. यावेळी माजी आमदार रमेश थोरात, वैशाली नागवडे, वीरधवल जगदाळे, नंदू पवार, गुरूमुख नारंग, बादशाह शेख, सागर फडके, नागसेन धेंडे, माणिक राऊत, पाराजी हंडाळ, मीना धायगुडे, राणी शेळके, ज्योती झुरंगे, वैशाली धगाटे, निखील स्वामी आदी उपस्थित होते.

Baramati Loksabha ajit pawar
Sharad Pawar : हुकूमशाहीच्या दिशेने चाललेले हे सरकार याला आत्ताच आवर घालण्याची वेळ

अजित पवार म्हणाले, गेली ५० वर्ष पवार साहेबांचे एेकत आलो. सातत्याने पवारसाहेब खासदार होते मात्र विकासाचा अनुशेष अजून बाकी आहे. मी पाण्याच्या प्रश्नाला प्राधान्य देणार आहे. दौंड, बारामती, पुरंदर इंदापूर तालुक्यात सिंचनासाठी पाणी कमी पडत आहे. मी पालकमंत्री होतो म्हणून खडकवासला व नीरा डाव्या कालव्याला पाणी दिसत आहे. नाही तर सर्व शेती जळून खाक झाली असती. यंदा दुष्काळी परिस्थिती आहे. धरणे भरलेली नाही. तुमच्या करता जे जे करता येईल ते करत गेलो.

तुम्ही म्हणाल नणंद ( सुप्रिया सुळे ) निवडून आली काय अन् भावजय ( सुनेत्रा पवार ) निवडून झाली काय, काय फरक पडतो. पण तसे नाही. सुप्रिया सुळे या गेली दहा वर्ष विरोधात खासदार राहिल्या. या काळातील एक तरी ठोस काम दाखवा. विकासकामांसाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांची मदत घेऊन मतदार संघाचा विकास करणार आहे. मुळशीचे पाणी वीज निर्मितीनंतर समुद्राला जात आहे. मोदी यांना सांगून मुळशीचे पाणी मिळविणार आहे. त्यामुळे पुणे शहर जिल्हाचा पाणी प्रश्न सुटणार आहे. दौंड तालुक्याचा विकास करायचा असेल तर घड्याळाला मतदान करा.

रमेश थोरात म्हणाले, अजित पवार हे कार्यक्षम नेतृत्व आहे. काम करणा-या माणसाच्या मागे उभे राहण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कार्यकर्त्यांना आपसातील मतभेद विसरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना विजयी करायचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उत्तम आटोळे यांनी प्रास्ताविक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.