पुणे- बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्याऐवजी त्यांचे पुत्र जय पवार निवडणूक लढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासंदर्भातील चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत. विशेष म्हणजे अजित पवार यांनी देखील याबाबत संकेत दिले आहेत. त्यामुळे बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळू शकतो.
बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये पवार घराण्यात लढत झाली होती. आता पुन्हा एकदा तशीच लढत होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. असे झाल्यास अजित पवार हे जय पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवू शकतात. किंबहुना तसंच होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.