शरद पवार यांच्यानंतर दिल्लीत महाराष्ट्राचा नेता म्हणून नितीन गडकरीच; अजित पवार

पुण्यात सिंहगड रस्ता येथील उड्डाणपूल व कात्रज येथील उड्डाणपुलाच्या भूमिपुजनासाठी ही नेतेमंडळी एकाच व्यासपीठावर आले होते.
Nitin Gadkari and Ajit Pawar
Nitin Gadkari and Ajit PawarSakal
Updated on

पुणे - राज्य सरकार आणि केंद्र सरकार असा वाद कोणत्या ना कोणत्या निमित्ताने उफाळून येत असताना आज मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने केंद्रीय भूपृष्ठ व नौवाहन मंत्री नितीन गडकरी यांच्यावर स्तुतीस्तुमने उधळली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांच्यानंतर दिल्लीत महाराष्ट्राचा नेता म्हणून नितीन गडकरी हेच आहेत असा शब्दात कौतुक केले.

पुण्यात सिंहगड रस्ता येथील उड्डाणपूल व कात्रज येथील उड्डाणपुलाच्या भूमिपुजनासाठी ही नेतेमंडळी एकाच व्यासपीठावर आले होते.

अजित पवार म्हणाले, ‘‘निवडणुकांमध्ये प्रत्येक पक्ष आपापली भूमिका मांडत असतो, पण निवडणुका झाल्यानंतर विकास कामे करताना एकत्र आले पाहिजे. राज्यातील कोणत्याही पक्षाचा खासदार दिल्लीत गडकरींना भेटल्यानंतर ते आपलेपणाने प्रश्‍न सोडवितात असे खासदार सांगतात. जसे पूर्वीच्या काळात दिल्लीत यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांच्यामुळे महाराष्ट्राला फायदा होत. तसेच आता गडकरींमुळे महाराष्ट्राला न्याय मिळतो आहे याचा आनंद आहे. मला वेळेत काम झालेले आवडते तसेच गडकरी यांचे आहे.

Nitin Gadkari and Ajit Pawar
सातारा रस्त्यांवरील टोल होणार रद्द'; नितीन गडकरी

सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘‘ केंद्र सरकारमध्ये नितीन गडकरी हे सर्वाधिक लोकप्रिय मंत्री आहेत. देशभरात त्यांची तशीच ओळख आहे. राजकारणात नेता कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे नितीन गडकरी आहेत. गडकरी यांनी माझ्या आणि अमोल कोल्हे यांच्या मतदारसंघांत भरीव मदत केली. पक्ष, मतदारसंघ याचा कधीही विचार करत नाहीत. फक्त अजून काम काही तरी सांग ते मी करतो अशी सहकार्याची भूमिका घेतात. राजकारणातील समतोल राखणारा व सुसंस्कृत नेते कसा असावा याचा अनुभव वारंवार येतो.

नीलम गोऱ्हे म्हणाल्या, ‘‘विधीमंडळातील आमदारांचे प्रश्‍न सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मांडत असतात, पण ज्या दृष्टीने तुम्ही काम करत आहात, ती दृष्टी आमदारांना समजावी म्हणून तुम्ही दिल्लीत आम्हाला निमंत्रित केले. पुढच्या आठवड्यात होणाऱ्या बैठकीतून राज्य आणि केंद्रांतील सहकार्याचा पूल आणखी मजबूत व्हावा.

Nitin Gadkari and Ajit Pawar
पुण्यात नितीन गडकरींच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे बॅनर

तर तुमच्याच खिशात हात घालावा लागेल

उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने सिंहगड रस्त्यावर शेकडो फ्लेक्स लावण्यात आले होते. त्यावर खासदार बापट यांनी ‘‘फ्लेक्स लावणाऱ्यांसाठी खास फ्लेक्स फंड तयार केला पाहिजे, या पैशातून कामाच्या कोनशिलेवर त्यांची नावे लिहिले पाहिजेत’’ अशा शब्दात कान टोचले. त्यावर नीलम गोऱ्हे यांनी ‘‘बापट यांनी सल्ला चांगला दिला आहे, पण जास्त फ्लेक्स तुमचेच असतात, त्यामुळे तुमच्याच खिशात हात घातला पाहिजे’’ असा टोला बापट यांना लावला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()