''कितीही संकट येवो, महाराष्ट्र कधी झुकला नाही, झुकणार नाही''

ajit pawar
ajit pawar
Updated on
Summary

राष्ट्रवादी काँग्रेसचा आज 22 वा वर्धापनदिन आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तमाम कार्यकर्त्यांचे अभिनंदन आणि आभार मानले.

राष्ट्रवादी काँग्रेसचा आज 22 वा वर्धापनदिन आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तमाम कार्यकर्त्यांचे अभिनंदन आणि आभार मानले. अजित पवार म्हणाले की, कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो आणि कार्यकर्तांशिवाय पक्षाला वैभव प्राप्त होत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्र जनतेने सातत्याने प्रेम दिलं. 2014 ची मोदी लाट वगळता राज्याच्या जनतेने राष्ट्रवादीवर विश्वास व्यक्त केला आणि राज्याच्या सत्तेमध्ये जबाबदारी दिली. पूर्ण क्षमतेने नसली तरी आघाडीच्या निमित्ताने संधी दिली. त्याबाबत सर्वांचे आभार आणि धन्यवाद. (ajit pawar speak on rashtrawadi congress ncp wardhapan din)

राष्ट्रवादीने जनतेच्या प्रेमाच्या जीवावर राज्यातील गावागावात भक्कम जागा केली आहे. जात, पात, धर्म, पंथ, प्रांत न पाहता सर्वांना सोबत घेऊन पक्ष पुढे वाटचाल करत आहेत. आव्हानं येत असतात. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वाभिमानातून पक्षाची स्थापना केली. देश, राष्ट्र डोळ्यासमोर ठेवून पक्षाची स्थापना केली. 22 वर्षांच्या काळात विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांची फळी पवार साहेबांनी उभी केली. या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पक्ष वाढला. त्यांच्यामुळेच आज हा पक्ष कोरोनाचे तंतोतंत पालन करत राज्यात आणि देशातील वेगवेगल्या भागात 22 वर्धापण दिन साजर करत आहेत, असं अजित पवार म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस हा महाराष्ट्राच्या मातीशी आणि जनतेची नातं सांगणारा पक्ष आहे. राज्यातील जनतेशी नाळ जोडणारा पक्ष आहे. महाराष्ट्राची स्थापना जशी संघर्षातून झाली, तशी पक्षाची स्थापनाही संघर्षातून आली. पक्ष संघर्ष करतच मोठा झालाय. याकाळात खूप संकट पाहिली. संघर्षाची लढणं आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या अडचणी सोडवण हेच पक्षाचं ध्येय आहे. कोरोना काळात सरकार संपूर्ण ताकदीने लढतंय, विरोधक टीका करताहेत. पण, मुंबई कोर्टानेही कोरोना परिस्थिती हाताळण्याबाबत कौतुक केलं होतं, असं पवार म्हणाले. गंगा-जमूनामध्ये मृतदेह आढळत असल्याचं दुर्दैवी चित्र आपल्याला पाहायला मिळालं. कोरोना काळात राष्ट्रवादीचे अनेक नेते समोर आले. धान्य, ऑक्सिजन, बेड्स मिळवून देण्यासाठी नेत्यांनी प्रयत्न केला. पुढेही मदत केली जावी. राष्ट्रवादीच्या विचारांना घराघरात पोहोचण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. महाविकास आघाडीच्या लोकउपयोगी निर्णय घराघरात पोहोचले पाहिजे, असंही ते म्हणाले.

भाजपवर टीका

भाजप सरकार केंद्रात आहे. एकता, अखंडता, सर्वधर्म समभाव विचारांना धक्का देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. लोकशाही टिकवून ठेवणाऱ्या संस्था मोडीत काढल्या जात आहेत. चौथा खांब म्हणून ओळख असणाऱ्या माध्यमांची स्थिती गंभीर आहे. त्यांच्यावर दबाब आहे. एकसुरातील त्यांचे सोशल मीडिया ट्विट पाहिल्यास भीती वाटते. लोकशाही टिकवण्याचे आव्हान आपल्यापुढे आहे. याविरोधात राष्ट्रवादी नेहमी खंभीरपणे उभा राहिले. पेट्रोलच्या किंमती वाढल्या आहेत, 105 रुपयांना पेट्रोल मिळतंय. 400 रुपयांचे सिलिंडेर 900 ला मिळतंय, 100 रुपयांचे केबल सुविधा आता 500 रुपयांना मिळतीये, करोडो बेरोजगार झालेत. महागाई वाढलीये. मराठा बांधवांना आरक्षण देण्याचं आव्हान, इतर मागासवर्गियांना बढती आरक्षणाचा मुद्दा, धनगर समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा मार्ग काढण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. लोकांना विश्वासात घेऊन आपल्याला आरक्षण मिळवून द्यायचं आहे. 50 टक्क्यांची मर्यादा शिथिल करावी लागेल, असं अजित पवार म्हणाले.

शाहु, फुले, आंबेडकरांच्या मार्गावर चालणारा हा महाराष्ट्र आहे. अनंत संकट आली, पण महाराष्ट्र कधी झुकला नाही, महाराष्ट्र कधी झुकणार नाही. अशा संकटाचा सामना करण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष सर्वात पुढे असेल. साहेबांच्या नेतृत्वात पुरोगामी महाराष्ट्राची वाटचाल अधिक गतीने होत आहे. एक रुपयाही कमी पडू देणार नाही. विकासाचा गाडा सुरुच राहील, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.