Ajit Pawar News: पुण्याचे कारभारी अजितदादा, तर चंद्रकांत पाटील? तिसऱ्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर ठरणार पालकमंत्री

Cabinet Expansion: पुन्हा चर्चा पालकमंत्रीपदाची! पुण्यापाठोपाठ कोल्हापुरात देखील अजित पवार गट ठरणार वरचढ, तिढा वाढणार
Ajit Pawar
Ajit PawarEsakal
Updated on

Guardian Minister of Pune: गेल्या काही दिवसात राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या आहेत. शिवसेनेनंतर राष्ट्रवादीमध्ये मोठी फुट पडली. अजित पवार यांच्यासह आणखी आठ आमदारांनी शिवसेना-भाजप यांना पाठिंबा देत मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्याच्या सरकारमध्ये अनेक बदल झाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असणारे अर्थमंत्रीपद अजित पवारांकडे आले, त्यानंतर शिवसेना-भाजप पक्षातील नेत्यांकडे असणारी अनेक खाती देखील अजित पवार गटातील नेत्यांकडे आली आहेत.

त्याचप्रमाणे आता राज्यात तिसऱ्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर लवकरच काही जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद हे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना दिलं जाणार असल्याची माहीती समोर आली आहे. राज्यातील तिसऱ्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर काही जिल्ह्यांचे पालकमंत्र्यांच्या पदाची अदलाबदल केली जाणार आहे.

Ajit Pawar
Uddhav Thackrey: "ते असे आहेत... ते तसे आहेत" राहुल गांधींना भेटल्यावर उद्धव ठाकरेंना काय वाटलं?

नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुण्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुण्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आहे. चंद्रकांत पाटील हे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पदासाठी आग्रही आहेत. मात्र कोल्हापूरचे पालकमंत्रीपदासाठी नव्याने सरकारमध्ये सहभागी झालेले मंत्री हसन मुश्रीफ हे देखील इच्छुक आहेत. यासंबधीचे वृत्त 'साम टिव्ही'ने दिले आहे.

Ajit Pawar
Uddhav Thackrey: 'बाळासाहेंबानी मोदी, शाहांना वाचवलं होतं, त्याचे पांग मला संपवून फेडणार का?', ठाकरेंचा सवाल

त्यामुळे पालकमंत्री पदावरून पून्हा एकदा सरकारमधील मंत्र्यांमध्ये तिढा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे भंडारा गोंदिया जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद हे धर्मराव बाबा अत्राम यांना तर नाशिकचे पालकमंत्री म्हणून छगन भुजबळ व बीडचे पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याची माहीती आहे.

Ajit Pawar
NCP Crisis: राष्ट्रवादी काकांची की पुतण्याची? केंद्रीय निवडणूक आयोगाची दोन्ही गटांना नोटीस; आता...

पुणे जिल्ह्यात आपला गट मजबूत करण्यासाठी त्यांना पालकमंत्रीपद हवे असल्याची चर्चा आहे. अजित पवार यांचे सर्वाधिक लक्ष पुण्याकडे आहे. विरोधात असताना ते पुण्यात सतत बैठका घेत होते. त्यामुळे पुण्यातील कार्यकर्ते आणि नेत्यांना अजित पवारच पालकमंत्री हवेत. मात्र या मागणीला भाजपकडून विरोध होऊ शकतो. त्यामुळे पालकमंत्री पदाचा तिढा वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.