Ajit Pawar Shirur: महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! अजित पवार बारामती सोडणार, शिरूरमधून लढणार?

Ajit Pawar vs Ashok Pawar Shirur: उपमुख्यमंत्री अजित पवार 1991 मध्ये झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीपासून 2019 पर्यंत सलगपणे मोठ्या मताधिक्याने विजयी होत आले आहेत.
Ajit Pawar Vs Ashok Pawar Shirur Assembly Election
Ajit Pawar Vs Ashok Pawar Shirur Assembly ElectionEsakal
Updated on

राज्यात येत्या काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. अशात राज्यातील सर्वच पक्षांनी या निवडणुकीसाठी तयारी केली आहे.

अशात आता महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी म्हणता येईल अशी बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी बारामतीमधून नव्हे तर शिरूर विधानसभा मतदारसंघातून लढणार आहेत. याबाबतचे वृत्त साम टीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

राज्यातील उमेदवार निवडीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीतील सर्वच पक्षांनी मुलाखती घेण्यास सुरूवात केली आहे. अशात भारतीय जनता पक्षाकडे असलेला पुणे जिल्ह्यातील शिरूर विधानसभा मतदारसंघात ईच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आलेल्या नाहीत. यासह हा मतदारसंघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे. ही सर्व परिस्थिती पाहता येथून अजित पवार निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार 1991 मध्ये झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीपासून 2019 पर्यंत सलगपणे मोठ्या मताधिक्याने विजयी होत आले आहेत. पण लोकसभा निवडणुकीनंतर बारामतीमधील परिस्थिती बदलली आहे. याचबरोब अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी बारामतीतून निवडणूक लढणार नसल्याचाही सूचक इशार दिला होता. अशात आता अजित पवार शिरूरमधून लढणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

Ajit Pawar Vs Ashok Pawar Shirur Assembly Election
Ladki Bahin Yojana Diwali Payment: लाडक्या बहिणींना दिवाळीपूर्वीच ॲडव्हान्समध्ये मिळणार दोन हफ्ते; अधिकाऱ्यांनी सांगितली तारीख

सध्या शिरूर मतदार संघातील आमदार अशोक पवार हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत आहेत. जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सर्व आमदार अजित पवार यांच्याबरोबर गेले होते. परंतू, अशोक पवार हे पुणे जिल्ह्यातील एकमेव आमदार आजही शरद पवार यांच्यासोबत कामय आहेत.

आता जर अजित पवार यांनी शिरूरमधून विधानसभा निवडणूक लढवली तर बारामतीतून घड्याळ आणि तुतारीच्या चिन्हावर कोणते उमेदवार असणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Ajit Pawar Vs Ashok Pawar Shirur Assembly Election
Vidhansbha Election : विधानसभेच्या रणधुमाळीत शरद पवारांची क्रेझ! राज्यभरातून मिळाले इच्छुकांचे 'इतके' अर्ज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.