Ajit Pawar : अजित पवार देखील होणार पालखी सोहळ्यात सहभागी; विधानसभेतून केली घोषणा

Ajit Pawar Ashaidhi Wari 2024 : यंदाच्या वर्षी पालखी सोहळ्यामध्ये स्वतः सहभागी व्हावेसे वाटले त्या मुळे आपण पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होणार असल्याचे अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
ajit Pawar will Join Ashadhi wari 2024 Shri Sant Tukaram Maharaj Palkhi baramati to katewadi route
ajit Pawar will Join Ashadhi wari 2024 Shri Sant Tukaram Maharaj Palkhi baramati to katewadi route
Updated on

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये बारामती ते काटेवाडी चालत सहभागी होणार आहेत. विधानसभेच्या अधिवेशनामध्ये बोलताना अजित पवार यांनी स्वतः ही माहिती दिली. दरवर्षी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा बारामतीतून निघून सणसरला मुक्कामी जातो.

गतवर्षी अजित पवार पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी बारामतीत उपस्थित होते. यंदाही अजित पवार पालखीसोबत बारामती ते काटेवाडी हे अंतर चालत जाणार आहेत. यंदाच्या वर्षी पालखी सोहळ्यामध्ये स्वतः सहभागी व्हावेसे वाटले त्या मुळे आपण पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होणार असल्याचे अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

ajit Pawar will Join Ashadhi wari 2024 Shri Sant Tukaram Maharaj Palkhi baramati to katewadi route
Team India Victory Parade : गुजरातच्या बसवरून राजकारण तापलं! मुंबई बेस्टकडे ओपन डेकर नसल्यानं संधी गमावली?

संत तुकाराम महाराजांची पालखी सोहळा शनिवारी (ता. 6) बारामतीत मुक्कामी असणार आहे. रविवारी (ता. 7) पहाटे ही पालखी बारामती वरून पिंपळी मार्गे काटेवाडी कडे मार्गस्थ होणार आहे. बारामती ते काटेवाडी हे अंतर आपण चालत पालखीमध्ये सहभागी होणार असल्याचे अजित पवार यांनी नमूद केले आहे. दरवर्षी काटेवाडी येथे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे धोतरांच्या पायघड्यांनी स्वागत केले जाते. दुपारच्या विसाव्यानंतर पालखी सणसरकडे मुक्कामासाठी मार्गस्थ होते.

ajit Pawar will Join Ashadhi wari 2024 Shri Sant Tukaram Maharaj Palkhi baramati to katewadi route
Rohit Sharma : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रोहितसह मुंबईच्या खेळाडूंचा वर्षावर झाला सत्कार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com