Baramati Crime News: बारामती तालुक्यातील सुपे येथील घटनेबाबत मी स्वताः पोलिस महासंचालकांशी बोलणार असून पोलिस यात योग्य तो तपास नक्की करतील असा विश्वास विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केला.
बारामतीत आज माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ही घटना चिंताजनक असून या बाबत अधिक बोलण्यापेक्षा पोलिसांना सहकार्य करत त्यांच्या तपासावर आपण लक्ष केंद्रीत करु, त्यांचा तपास सुरु असल्याने या बाबत बोलणे अजित पवार यांनी टाळले.
पुण्याच्या लोकसभेच्या जागेबाबत दिवंगत खासदार गिरीश बापट यांचा दुखवटा तरी संपू द्या, थोडीतरी माणूसकी कायम ठेवा या आपल्या विधानाचा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बारामतीत पुनरुच्चार केला. अशा घटनेनंतर आम्ही विरोधी पक्षांनी तसेच सत्ताधारी पक्षांनीही काही तारतम्य बाळगण्याची गरज असल्याचे मत त्यांनी बोलून दाखवले.
छत्रपती संभाजीनगर मध्ये जे झाले ते दोन भिन्न समाजातील दंगल नसून एकाच समाजातील दोन गटात झालेला वाद होता, तिथली परिस्थिती पोलिसांनी आटोक्यात आणली आहे, माध्यमे व विरोधी पक्षांनीही याला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करु नये, असे आवाहन अजित पवार यांनी केले. आपसातील भांडण होते, आता तेथील परिस्थिती नियंत्रणात असून महाविकास आघाडीच्या सभेला पोलिसांनी परवानगी दिली आहे, असेही त्यांनी नमूद केले.
माळेगावचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे व सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांना मी बोलावून घेतले होते, ते ज्या कारखान्याचे अध्यक्ष आहेत, या दोन्ही कारखान्यांचा झिरो डिसचार्ज व्हायला पाहिजे, नदीकाठचे गावकरी त्रास होत असल्याचे सांगत आहेत, फलटण तालुक्यातील काही दूध प्रकल्प तसेच कत्तलखान्याचेही पाणी येत आहे, सोमेश्वरच्या वरच्या भागातील डिस्टलरीतूनही पाणी येत आहे, मी मुंबईला गेल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाला या बाबत सांगणार आहे, कारखान्यांनीही काळजी घ्यायला हवी असे ते म्हणाले.
मी गृहमंत्री झालेले काही लोकांना पटत नाही अस देवेंद्र फडणवीस म्हणतात या बाबत विचारले असता मीच त्यांची भेट होईल तेव्हा त्यांना विचारतो की बारामतीत मला पत्रकार असे विचारत होते, या वर तुमचे काय मत आहे, असे म्हणत त्यांनी हा प्रश्नच उडवून लावला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.