Ajit Pawar: अयोध्या राम मंदिराच्या दर्शनासाठी अजित पवार जाणार; महिनाही ठरला

ajit pawar ayodhya ram mandir
ajit pawar ayodhya ram mandir sakal
Updated on

AJit Pawar Narayangao: अयोध्या येथील श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण आम्हाला होते.मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री राम मंदिराच्या दर्शनासाठी नंतर जाण्याचा निर्णय घेतला.यामुळे आम्ही तारीख निश्चित करून फेब्रुवारी महिन्यात आयोध्या येथे श्रीरामाच्या दर्शनासाठी जाणार आहोत. अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हेलिकॉप्टरने येथील कृषी विज्ञान केंद्राच्या हेलीपॅड वर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आगमन झाले. त्यांच्या हस्ते येथील कृषी विज्ञान केंद्राच्या ग्लोबल कृषी महोत्सव ॲपचे उदघाटन झाले. त्यानंतर त्यांनी कृषी विज्ञान केंद्राने लागवड केलेल्या विविध भाजीपाला पिकांची पाहणी केली.

ajit pawar ayodhya ram mandir
Jayant Patil यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन Sharad Pawar vs Ajit Pawar गटात घमासान

दुपारी एक वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार अतुल बेनके यांनी येथील श्रीराम मंदिर, हनुमान मंदिर या ठिकाणी भेट देऊन दर्शन घेतले.श्रीराम मंदिरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला.

श्रीराम मंदिरात झालेल्या कार्यक्रमात ब्राह्मण संघाचे अध्यक्ष सेवानिवृत्त लेफ्टनंट उमेश अवचट, सल्लागार डॉ. संदीप डोळे, उपाध्यक्ष निरंजन जोगळेकर, संतोष वैद्य यांच्या हस्ते श्री रामाची प्रतिमा भेट देऊन उपमुख्यमंत्री पवार, सहकार मंत्री वळसे पाटील, आमदार बेनके यांचा सत्कार केला. यावेळी जुन्नर बाजार समितीचे सभापती संजय काळे, गणपतराव फुलवडे, अरविंद ब्रम्हे, रवींद्र पारगावकर, शितल ठुसे, अनघा जोशी, युवा नेते अमित बेनके, सुजित खैरे, गणेश वाजगे, रोहिदास केदारी, श्रीराम पतसंस्थेचे उपाध्यक्ष शशिकांत वाजगे, संचालक सुनील श्रीवत, अनिल थोरात, अनिल डेरे, विजय घोगरे आदी उपस्थित होते.

ajit pawar ayodhya ram mandir
Ajit Pawar: अजित पवार रमले पन्नास वर्षांपूर्वीच्या आठवणींमध्ये; शाळेच्या रजिस्टरवर होतं नाव

यावेळी अरविंद ब्रम्हे यांनी येथील श्रीराम मंदिराच्या सभागृह व भोजनगृहाच्या बांधकामासाठी 55 लाख रुपयांच्या निधीची मागणी केली. या बाबत उपमुख्यमंत्री पवार म्हणाले येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिर सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वीचे आहे. या मंदिराचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्या. श्रीराम मंदिर सभागृहाच्या उभारणीसाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल. या वेळी त्यांनी श्री राम मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले.

उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले आयोध्या येथील श्री राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा देशातील व जगातील नागरिकांनी डोळ्यात साठवून ठेवला. राज्याचा कारभार करत असताना राज्यात शांतता नांदावी,सर्व जाती धर्मात सलोखा असावा, एकोपा असावा. असा आमचा प्रयत्न असतो. नागरिकांनी सुद्धा राज्यात चांगले वातावरण राहील यासाठी प्रयत्न करावा. सूत्रसंचालन रामदास अभंग यांनी केले.

ajit pawar ayodhya ram mandir
Ajit Pawar News: एक किंवा दोन अपत्यावर थांबा, नाहीतर सर्वांना घर देणं ब्रह्मदेवालाही शक्य नाही; अजित पवारांचे वक्तव्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.