आळंदी - गणेश उत्सव म्हटले की चोविस तास अलर्ट, बंदोबस्ताचा ताण. पण हे सगळं सांभाळून दिघी पोलिस ठाण्यातील महिला पोलिस कार्यालयातील विराजमान गणपती बाप्पाची पुजा करतात. सोबत रात्रीच्या वेळी भजनाचा ठेकाही धरत आहेत. गेली चार वर्षापासून कार्यरत महिला पोलिस रेखा वाजे यांच्या सुमधूर आवाजातील गवळणीची भूरळ सोबतच्या सहकार्यांना पडली आहे.