आळंदी - ढोल ताशांच्या दणदटात... बॅंण्डचा तालसुर.... अन टाळमृदंगाचा गजर करत उत्साहातील गणेशभक्तांनी घरगुती आणि सार्वजनीक गणेशमुर्तीचे विसर्जन रात्री बाराच्या दरम्यान पार पडले. नदिप्रदूषण टाळण्यासाठी परिषदेच्या आवाहनास प्रतिसाद देत सुमारे सात हजार गणेशमुर्त्यांचे नदीकाठीच नगर परिषदेच्यावतीने उभारलेल्या मूर्ती संकलन केंद्रात पर्यावरणपूरक गणेश विसर्जनास आळंदीकरांनी पसंती देत संपुर्ण गणेश विसर्जन सोहळा शांततेत पार पडला.