-राजेश कणसे
आळेफाटा : जुन्नर तालुक्यातील वाढत्या दरोडयांणा आत घालण्यात स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण व आळेफाटा पोलीसांणा यश आले आहे.आळेफाटा या ठिकाणी साई इलेक्ट्रॉनिक या दुकानावर जो दरोडा पडला होता त्या दरोडयातील ६ आरोपींना पकडण्यात पोलीसांणा यश आले आहे.याबाबत आळेफाटा येथील पोलीस स्टेशन मध्ये आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत माहीती देताणा अप्पर पोलीस अधीक्षक मितेश मिट्टे यांणी सांगीतले की आळेफाटा (ता.जुन्नर) या ठिकाणी दि.६ रोजी साई इलेक्ट्रॉनिक या दुकानात ६ अनोळखी इसमांनी येवुन अॅप्लीफायर रिपेरिंग करायचा आहे असा बनाव करून दुकानाचे शटर खाली करून जवळील असलेल्या पिस्तुलाचा धाक दाखवून दुकानातील २१ हजार रूपये मुद्देमाल व रोख रक्कम जबरदस्तीने घेवुन गेले होते.दुकान मालक अविनाश पटाडे यांणी केलेल्या फिर्यादीवरून अनोळखी आरोपींवर गुन्हा दाखल केला होता.त्यानुसार घटनास्थळी पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांणी भेट देऊन तपास सुरू केला व त्या अनुशंगाने पोलीस तपास पथके सदर गुन्ह्यातील समांतर तपास करीत होते फिर्यादीचे साऊंड इलेक्ट्रॉनिक दुकानमध्ये डि.जे.संबंधित असल्यामुळे यातील आरोपींनी देखील डि.जे.शी संबधित चौकशी केली होती.
त्यावरून तपास पथकांनी त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करून तसेच आरोपींनी परिधान केलेल्या कपड्यावरून व त्याचे वर्णनावरून पुणे व अहमदनगर जिल्ह्यातील मध्ये माहीती काढल्यानंतर व गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार सदर गुन्ह्यातील १)रूशिकेष बळवंत पंडीत (वय२२रा.खरंडी ता.नेवासा,२)अरबाज नवाब शेख(वय २० रा.वडाळा व्होरोबा ता .नेवासा ,३) वैभव रविंद्र गोरे (वय२१ रा.खरवंडी ता.नेवासा,४)राहुल राम चव्हाण (वय२० रा.खरवंडी ता.नेवासा ,५)शुभम बाळासाहेब शिंदे (वय २१ रा.खरवंडी ता.नेवासा , ६)प्रकाश विजय वाघमारे (वय २० रा .माळी चिंचोरा ता.नेवासा या आरोपींना अहमदनगर जिल्ह्यातील वेगवेगळया ठिकाणाहून ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांणी सदर गुन्ह्यातील कबुली दिली आहे.
हि कारवाई करत असताणा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक मितेश मिट्टे, स्थानिक गुन्हेचे अशोक शेळके,उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे आळेफाटा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर,उपपोलीस निरीक्षक सुनील बडगुजर ,नितीन गंधाने,दिपक साबळे,राजु मोमीन,संदिप वारे,अक्षय नवले,रघुनाथ शिंदे,राजेंद्र पवार,रागीणी कराळे,चंद्रशेखर डुंबरे,विनोद गायकवाड,लहानु बांगर, अमित वाळुंजे ,अरविंद वैद्य,निखील मुरूमकर,मोहन आनंदगावकर,हनुमंत ढोबळे,महेश काठमोरे,प्रशांत तागडकर,गोरक्ष हासे ,अनिल केरूरकर,महेश पठारे ,युवराज पाटील व किशोर जोशी या पोलीसांणी तपास केला आहे.दरम्यान चौदा नंबर येथील अनंत पतसंस्थेवर जो दरोडा पडला होता त्या दरोड्यात संस्थेचे व्यवस्थापक राजेंद्र भोर यांचा गोळ्या घालुन ठार करून अडीच लाख रूपये दरोडेखोरांनी चोरून नेले होते त्याचाही तपास चालु आहे अशी माहीती अप्पर पोलीस अधीक्षक मितेश मिट्टे यांणी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.