Pune : कबुतरांच्या स्पर्धेला राष्ट्रीय खेळाची ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न; अली दारूवाला

भाजपचे राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे नवनियुक्त सल्लागार यांचे प्रतिपादन; पुणे पीजन मित्र असोसिएशनतर्फे कबुतर स्पर्धेचे वार्षिक पारितोषिक वितरण
Ali Daruwala statement Efforts to promote pigeon racing national sport bird pune
Ali Daruwala statement Efforts to promote pigeon racing national sport bird punesakal
Updated on

कॅन्टोन्मेंट : कबुतर पाळणाऱ्या समूहाची पीजन मित्र असोसिएशन ही देशपातळीवरील एकमेव संस्था आहे. त्याच्या पुणे शाखेतर्फे कबुतरांची उडण्याची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला राष्ट्रीय खेळ म्हणून मान्यता मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे," असे मत भाजपचे राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे नवनियुक्त सल्लागार अली दारूवाला यांनी व्यक्त केले.

Ali Daruwala statement Efforts to promote pigeon racing national sport bird pune
Pune Loksabha Election : पुणे लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी १२ हजार ६०० मशिन उपलब्ध

पुणे पीजन मित्र असोसिएशनतर्फे कबुतर स्पर्धेचे वार्षिक पारितोषिक वितरण २०२२-२३ या कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी (ता. २०) कॅंप, पुणे येथे करण्यात आले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष (चेन्नई) व्ही. सत्या हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. चेन्नई येथील इनकम टॅक्स विभागाचे अरुण कुमार, भाजपचे पुणे संघटन सरचिटणीस गणेश घोष, संस्थेचे अध्यक्ष शैलेंद्र जाधव, उपाध्यक्ष शशिकांत बालवडकर, सचिव सलीम शेख यांची उपस्थिती असेल.

यावेळी भाजपच्या राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाच्या सल्लागारपदी नेमणूक झाल्यानिमित्त कार्यक्रमाचे संयोजक अली दारूवाला यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्या म्हणाले, " देशभरात या स्पर्धेबाबत कुतूहल आहे. केरळ, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तमिळनाडू, महाराष्ट्रात अशा स्पर्धा होतात. हा पूर्णपणे एक खेळ आहे. आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करून यासंबंधीच्या स्पर्धा घेतल्या जातात. त्यात काही अडचणी आहेत, त्या सोडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत."

Ali Daruwala statement Efforts to promote pigeon racing national sport bird pune
Pune : झाडाचे कटींग, फांद्या टाकणार्‍या विरुद्ध पोलिसात तक्रार, १० हजार दंड

अरुण कुमार म्हणाले, २०१० ला हा कबुतर शो सुरू केला. तीन वर्ष यश मिळाले नाही. पण मी हार मानली नाही. स्पर्धा लवकर सुरू करा. ही पूर्ण कायदेशीर स्पर्धा आहे. चांगले पक्षी गोळा करा. थोडे ठेवा. ते यश मिळवून देतील. धान्य सुकवून आणि धुवून स्वच्छ करून पक्षांना खाऊ घाला. किती किमीच्या स्पर्धेत कोणता पक्षी सहभागी करायचा हे मालकाला कळणे महत्वाचे आहे." गणेश घोष म्हणाले, "संघटना राष्ट्रीय स्तरावर काम करते, याचे कौतुक वाटते. या स्पर्धेत, तसेच संघटनेला येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी भाजपचा प्रतिनिधी म्हणून प्रयत्न करू."

Ali Daruwala statement Efforts to promote pigeon racing national sport bird pune
Pune Loksabha Election : पुणे लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी १२ हजार ६०० मशिन उपलब्ध

शैलेंद्र जाधव म्हणाले, " १५० ते १००० किमी च्या घेतो. इतक्या प्रदीर्घ अंतरात पक्षी ठरलेल्या वेळेत जाऊन घरी परत येतात. २५ ते २७ पक्षी या स्पर्धेत सहभागी झाले. स्पर्धेचा कालावधी दोन महिन्यांचा असतो. त्यात दर आठवड्याला एका गटातील स्पर्धा होते. पक्ष्यांच्या पायात विशिष्ट टॅग असतो. टॅग काढला की त्याद्वारे पक्षाने किती अंतर कापले, कोण जिंकले हे कळते."

दरम्यान, २७५ किमीच्या पुणे- जालना या अंतराच्या कबुतर उडणे स्पर्धेत मुस्तफा पटेल यांनी प्रथम पारितोषिक पटकाविले. तर शैलेंद्र जाधव, सुनील अलकुंटे यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे पारितोषिक जिंकले. इतर गटातील विजेत्यांना देखील यावेळी पारितोषिके देण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()