Adv. Dharmendra Khandre : सर्व बलुतेदार कारागिरांनी विश्वकर्मा योजनेचा लाभ घ्यावा : अँड धर्मेंद्र खांडरे

प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या कारागिरांना टूलकिट खरेदीसाठी १५ हजार रूपयांच्या पावत्यादेखील देण्यात येणार आहे.
Adv. Dharmendra Khandre
Adv. Dharmendra Khandreesakal
Updated on

मंचर : “केंद्र शासनाच्या सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योग विभागाने पारंपरिक काम करणाऱ्या बलुतेदार कारागिरांसाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू केली आहे. प्रशिक्षण घेणाऱ्या कारागिरांना ५ दिवसीय मुलभूत प्रशिक्षण व १५ दिवसीय कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार असून प्रशिक्षण कालावधीत प्रति दिन ५०० रूपये विद्यावेतन दिले जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या कारागिरांना टूलकिट खरेदीसाठी १५ हजार रूपयांच्या पावत्यादेखील देण्यात येणार आहे. या योजनेचा फायदा सर्व बलुतेदार कारागिरांनी घ्यावा.” असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य अँड धर्मेंद्र खांडरे यांनी केले आहे.

Adv. Dharmendra Khandre
Nashik News : सिन्नरमधील 36, 234 विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण

मंचर (ता.आंबेगाव) येथे शनिवारी (ता.१५) अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघाने आयोजित केलेल्या मेळाव्यात अँड.खांडरे बोलत होते. यावेळी महाज्योतीच्या नाशिक प्रादेशिक अधिकारी सुवर्णा पगार, भाजपचे जनसेवक संजय थोरात, प्रदेशाध्यक्ष हनुमंतराव पांचाळ, ग्रंथमित्र रमेश सुतार,गणपतराव गायकवाड, भरत भालेराव, नथू मानमोडे, रवींद्र रायकर, किशोर कदम, गायत्री क्षीरसागर, मनिषा रायरीकर, मनिषा सुतार, नवनाथ थोरात उपस्थित होते.

Adv. Dharmendra Khandre
Nashik Crime News : पहिली पत्नी असताना दुसरा विवाह करून छळ!

अँड.खांडरे म्हणाले “विश्वकर्मा योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी पारंपरिक बलुतेदार कारागिरांना अल्प व्याजदरात विनातारण तीन लाख रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.” सुरेश अभंग, बाळासाहेब जाधव, नितीन बारावकर यांनी व्यवस्था पाहिली

Adv. Dharmendra Khandre
Nashik Crime News : पहिली पत्नी असताना दुसरा विवाह करून छळ!

“सदर योजेनेचे लाभार्थी निवडण्यासाठी योजना ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात सुरुवात केली आहे. सामान्य सुविधा केंद्र (सीएससी), सेंटरवर व आपले सरकार सेवा केंद्र येथे तसेच मंचर येथील भाजप कार्यालयात दररोज सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत विनामुल्य ऑनलाईन पद्धतीने लाभार्थ्याची नाव नोंदणी सुरु केली आहे.”

-संजय थोरात, जनसेवक भाजप.

“महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (महाज्योती) इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग समाजातील युवक-युवतींना उद्योग व्यवसाय, शिक्षण, शासनाच्या सेवेतील संधींसाठी मोफत प्रशिक्षण कार्यक्रम राबाविला जातो.लक्षित घटकातील विद्यार्थ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा.”

- सुवर्णा पगार, प्रादेशिक अधिकारी महाज्योती नाशिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.